
“सोशल मिडीया” च्या एका मॅसेजवर तात्काळ मदत करण्यात
व्हीआयपी, फ्रिडम व साकोली मिडीयातर्फे गोरगरीबाला आधार ; गरीबाचे घर पावसात क्षतीग्रस्त
संजीव भांबोरे
भंडारा _शहरातील अमराई वस्तीतील गोरगरीब वैकुंठी परीवाराचे घर संततधार पावसाने क्षतीग्रस्त झाले. यावर “व्हीआयपी मिडिया” या व्हॉट्सॲप समुहात त्यांना मदतीचा हात द्यावा असे आवाहन केले. आणि अवघ्या अर्ध्या तासातच सामाजिक कार्यकर्त्यांनी थेट गोरगरीब परीवाराच्या घरी जाऊन पावसाच्या बचावासाठी मोठी ताडपत्री देण्यात आली. हे जलदगतीचे व माणूसकीची मिसाल कायम केली आहे येथील व्हीआयपी ग्रुप, साकोली मिडिया व फ्रिडम युथ फाऊंडेशनने.
तीन दिवस सतत पाऊस सुरू आहे. अमराई वस्तीतील गोरगरीब वैकुठी परीवाराचे अत्यंत जीर्ण मातीचे घर आहे. ते पूर्णतः क्षतीग्रस्त झाले. याची सुचना फ्रिडमचे अध्यक्ष किशोर बावणे यांनी ( शनि. २६ जुलै ) ला स. १०:४५ ला सोशल मिडियाच्या “व्हीआयपी ग्रुप” मध्ये टाकून यांना तातडीने मदतीचा हात देण्यासाठी आवाहन केले. यातच अत्यंत जलदगतीने याची दखल घेत व्हीआयपी संचालक अनिल कापगते, सामाजिक कार्यकर्ता महेश पोगळे, झनकलाल लांजेवार, साकोली मिडीयाचे आशिष चेडगे, युवा अंकीत कापगते यांनी किशोर बावणे यांना बोलावून अर्ध्या तासात त्या वैकुंठी परीवाराच्या घरी भर पावसात पोहचले. त्यांना आलेले मित्र सहकारींच्या सहकार्याने मोठी ताडपत्री देण्यात आली. जेणेकरून अतिवृष्टीमुळे राहीलेले घरही कोसळून जाऊ नये. या गोरगरीब परीवारात वृद्ध दांपत्य मार्कंडपुरी नागपुरी वैकुंठी वय ८४, कलाबाई मार्कंडपुरी वैकुंठी ७९, मुलगी देवकाबाई वैकुंठी ४२, नातवंडे यशोदा वैकुंठी १८, पिंजल वैकुंठी १५ हे राहतात. अत्यंत जीर्ण व पडक्या अवस्थेत असलेली ही झोपडी केव्हाही कोसळू शकते. याप्रसंगी या सामाजिक कार्यकर्त्यांनी सांगितले की, तात्पुरती यांना इतर जागी आश्रय दिला जाईल व स्थानिक नगरपरिषदेकडे यांना सुद्धा आवास योजनेंतर्गत घरकुल देण्यात येईल असे सांगितले.
शहरातील हे “व्हीआयपी ग्रुप – साकोली मिडीया – फ्रिडम युथ फाऊंडेशन” संयुक्तपणे अश्या गोरगरीब जनतेसाठी अती तात्काळ दखल घेत असून या एका “सोशल मिडीया” च्या एका मदतीचा हात आवाहन करताच अवघ्या अर्ध्या तासातच सदर समुहातील सदस्यगणांनी भर पाऊस सुरू असतांनाच गोरगरीब वैकुंठी यांचे घर गाठून त्यांना दिलासा देत एक माणुसकीची मिसाल कायम केली आहे. याप्रसंगी वैकुंठी या वृद्ध दांपत्यांनी या जागृत सदस्यांचे आभार मानून मनात मात्र “ईश्वर यांचे सदैव भले करो” असे म्हणत जणू आशिर्वाद दिला हे सत्य.