Thursday, January 15, 2026

National

spot_img

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाला मनोहरभाईंची सढळ व हृदयस्पर्शी मदत

सरन्यायाधीश न्यायमुर्ती भुषण गवई यांनी दिला त्या अभिनव आठवणींना उजाळा ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भदन्त आर्य नागार्जुन सुरेई ससाई हे देखील होते उपस्थित •

संजीव भांबोरे
नागपूर-नागपूर दिक्षाभूमी परिसरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाच्या उभारणीत व जडणघडणीत स्मारक समितीच्या पदाधिकाऱ्यांसह इतरांचेही योगदान राहिले आहे. एकेकाळी महाविद्यालयाचे शिक्षक व कर्मचाऱ्यांना वेतन द्यायला पैसा नव्हते. अशावेळी माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांचे वडील, गोंदियाचे उद्योजक मनोहरभाई पटेल यांनी मदतीचा हात पुढे केला, अशी आठवण सरन्यायाधीश भूषण गवई यांनी सांगितली.

दीक्षाभूमी स्मारक समिती संचलित डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाचा हीरक महोत्सवी सोहळा शनिवार ०२ ऑगस्टला सरन्यायाधीश भूषण गवई तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सामाजिक न्यायमंत्री संजय सिरसाट, मुंबई उच्च न्यायालयाचे वरिष्ठ न्यायमूर्ती चंद्रशेखर, स्मारक समितीचे अध्यक्ष भदन्त आर्य नागार्जुन सुरेई ससाई, डॉ. कमलताई गवई आदींच्या उपस्थितीत पार पडला.

याप्रसंगी सरन्यायाधीश भूषण गवई म्हणाले की, जिव्हाळ्यातून जेवायला या अशी अट टाकली होती व दीक्षाभूमी स्मारक समितीच्या पदाधिकाऱ्यांनी अतिशय कठीण परिस्थितीतून डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाची उभारणी केली. सुरुवातीला चार खोल्यांच्या चाळीत महाविद्यालय चालायचे. एकदा तर प्राध्यापक व कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी पैसे नव्हते. तेव्हा दादासाहेब गवई, दादासाहेब कुंभारे आदींनी उद्योजक मनोहरभाई पटेल यांच्याकडे अडचण सांगितली. पटेल यांना संस्था व पदाधिकाऱ्यांबद्दल आत्मीयता होती. त्यांनी जिव्हाळ्यातून अट टाकली की, आपण दोघे गोंदियाला येऊन माझ्याकडे जेवण केले तर मदत करू. दोघेही त्यानुसार गोंदियाला गेले व महाविद्यालयाला मदत मिळाली. अशा कठीण परिस्थितीतून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाला हे वैभव प्राप्त झाले आहे असे प्रतिपादन केले.

International

RELATED ARTICLES