
*”शाश्वत शेती”: भविष्याच्या दिशेने एक पाऊल…* *उर्मिला चिखले* , प्रकल्प संचालक आत्मा, भंडारासंजीव भांबोरेभंडारा -नैसर्गिक, जैविक शेती, सेंद्रिय शेती ही संपूर्ण नैसर्गिक पर्यावरण पूरक आणि शाश्वत शेतीची उदाहरणे असून दिवसेंदिवस बदलत्या भौगोलिक परिस्थितीनुसार शेतीसाठी वाढणारा उत्पादन खर्च त्यासाठी लागणारे निविष्ठा आणि एकंदरीत संपूर्ण सजीव सृष्टी निसर्गाचे समतोल या संपूर्ण गोष्टींचा विचार पाहता *शाश्वत शेती* ही एक संकल्पना *मानवी आरोग्यास आणि पर्यावरणास पोषक ठरेल असे मोलाचे मार्गदर्शन* *दिनांक ७ ऑगस्ट २०२५* ला ग्रामपंचायत कार्यालय मौजा खैरी तालुका जिल्हा भंडारा येथील *हरितक्रांतीचे प्रणेते कै. डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांच्या यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने* त्यांनी केलेल्या कार्याच्या उल्लेख म्हणून शाश्वत शेती दिन साजरा करण्यात आला. त्यांच्या महान कार्यामुळे त्यांना भारतीय हरित क्रांतीची जनक म्हणून ओळखले जाते. भारतातील दुष्काळी परिस्थितीत डॉ *. एम. एस. स्वामीनाथन यांनी गहू आणि भात पिकाची उत्पादन आणि उत्पादकता वाढवण्यासाठी केलेल्या त्यांच्या महत्त्वपूर्ण कार्यामुळे भारत अन्नधान्य संपूर्ण झाला आणि म्हणून त्यांनी केलेल्या कार्याचा सन्मान म्हणून केंद्र शासनाने त्यांना २०२४ मध्ये भारतरत्न सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित केले.* या पार्श्वभूमीवर भारतरत्न स्वामीनाथन यांच्या जन्मशताब्दीबाबद ७ आगस्ट हा दिवस महाराष्ट्र शासनाने *शाश्वत शेती दिन* म्हणून दरवर्षी साजरा करण्याचा निर्णय घेतला. त्या अनुषंगाने शेतकरी बांधवांनी उत्पादनासाठी लागणारा खर्च कमीत कमी करून चांगल्या गुणवत्तेचे आणि शाश्वत उत्पादन घ्यावे असे मोलाचे मार्गदर्शन उर्मिला चिखले यांनी केले. सदर कार्यक्रमाला अशोक जिभकाटे तालुका कृषी अधिकारी, भंडारा यांनी आपले मार्गदर्शन भाषणातून कृषी विभागांतर्गत विविध योजना, गोपीनाथ मुंडे अपघात सानुग्रह योजना, महाडीबीटी आणि शेती व्यवसाय सोबतच शेती आधारित कुक्कुटपालन, पशुपालन, दुग्ध व्यवसाय, इत्यादी व्यवसाय करून शेतकरी बांधवांनी आपले उत्पन्नात वाढ करावी असे प्रतिपादन केले.सदर कार्यक्रमाला *प्रमुख मार्गदर्शक म्हणून अरुण हारोडे मंडळ कृषी अधिकारी, भंडारा* यांनी उपस्थित शेतकरी बांधवांना राष्ट्रीय नैसर्गिक शेती मिशन अभियान अंतर्गत सुरू असलेल्या प्रकल्पाची माहिती देऊन नैसर्गिक शेती ही शाश्वत शेती असून नैसर्गिक शेतीच्या माध्यमातून जीवामृत, दशपर्णी अर्क, घनामृत, बिजामृत, गांडूळ खत, सप्त धान्य सारी इत्यादी विषयावर सखोल मार्गदर्शन करून उपस्थित शेतकऱ्यांना प्रात्यक्षिकाद्वारे जीवामृत बनवण्याची पद्धती आणि त्यांचे प्रमाण फायदे इत्यादी बद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून मुलचंद ईश्वरकर सरपंच, खैरी अध्यक्षस्थान मदन मारबते उपसरपंच, खैरी यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. सदर कार्यक्रमाचे आयोजन सतिश वैरागडे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापन, भंडारा यांनी करून कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.एकता मानकर सहा. कृषि अधिकारी, खैरी यांनी करून कार्यक्रमाचे प्रास्ताविक अरुण हारोडे मंडळ कृषी अधिकारी,भंडारा यांनी आणि आभार नेहा ईश्वरकर कृषि सखी यांनी केले. सदर कार्यक्रमाला निशा ठवकर कृषि सखी आणि परिसरातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.



