
………. लेख………*नवीन पिढीला लग्नाची भीती का वाटते? –*आजची तरुण पिढी स्वप्नवत जगते, आधुनिक तंत्रज्ञानाने सजलेली, स्वतंत्र विचारांची आणि आत्मनिर्भरतेच्या मार्गावर चाललेली आहे. अशा वेळी विवाह या पारंपरिक संस्थेबद्दल अनेक प्रश्न तिच्या मनात उद्भवतात – आणि याच प्रश्नांमधून भीतीचा उद्गम होतो. पण ही भीती म्हणजे नकार नाही, तर ती एका नव्या विचारप्रवाहाची चाहूल आहे. भीती निर्माण होण्याची कारणे:- *स्वातंत्र्य गमावण्याची भीती*:- आजची तरुणाई शिक्षण, नोकरी, पर्यटन, छंद, करिअर यामध्ये स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व निर्माण करत आहे. त्यांना वाटतं की, लग्न म्हणजे जबाबदाऱ्यांची बेडी, स्वप्नांना बांध घालणारा निर्णय. *अविश्वास आणि नात्यांतील अस्थिरता*:- घटस्फोटांचं प्रमाण वाढणं, घरात पाहिलेल्या भांडणं किंवा दांपत्य जीवनातील संघर्ष यामुळे नात्यांवरचा विश्वास डळमळीत होतो. त्यातून विवाह म्हणजे संकटांची सुरुवात, अशी चुकीची धारणा तयार होते.*आर्थिक स्थैर्याची अपेक्षा*:- “आधी स्थिरता, मगच विवाह” ही नव्या पिढीची भूमिका आहे. नोकरी, घर, वाहन, बचत या गोष्टी पूर्ण केल्याशिवाय विवाहाच्या विचारांनाही थारा नाही. या अपेक्षा पूर्ण करणे कठीण वाटल्यास लग्न टाळले जाते.*करिअरवरील लक्ष केंद्रित*:- सध्या करिअर हा प्रत्येकाचा प्राधान्यक्रम आहे. शिक्षण, स्पर्धा परीक्षा, पदव्या, यशाच्या शिड्या चढणं या धावपळीत विवाहाला वेळ देणं कठीण वाटतं.*विवाह म्हणजे “कमिटमेंट”*:- एकाच व्यक्तीसोबत संपूर्ण आयुष्य जगावं लागेल ही कल्पनाच भीतीदायक वाटते. “आपण योग्य जोडीदार निवडू शकू का?” हा संभ्रम त्यांच्या निर्णयाला थांबवतो.या भीतीवर मात कशी करावी? – एक प्रेरणादायी दृष्टिकोन*विवाह म्हणजे अडथळा नाही, सहप्रवास आहे*:- विवाह म्हणजे फक्त सामाजिक सोहळा नाही, तर जीवनाच्या प्रवासात एक साथीदार मिळवणं आहे. योग्य व्यक्ती मिळाल्यास जीवनाची सुंदरता दुप्पट होते. तो स्वतंत्रतेवर आघात न होता, तिचा विस्तार करणारा असतो.*नात्यांची जबाबदारी म्हणजे ओझं नव्हे, संधी आहे*:- एकमेकांना समजून घेणं, सहकार्य करणं आणि कठीण काळात हात न सोडणं या गोष्टी माणसाला अधिक समृद्ध बनवतात. जबाबदारी म्हणजे परिपक्वतेकडे जाणारी पायरी आहे, अडथळा नव्हे.*भविष्यातील अनिश्चिततेला सकारात्मकतेने सामोरे जा*:- नात्यांत थोडे चढउतार आले तरी, संवाद, समजूतदारपणा आणि विश्वास याने ते सावरता येतात. कुठलेही नातं परिपूर्ण नसतं, पण परिपक्वता त्याला टिकवून ठेवते. *विवाह आणि स्वप्न दोन्ही शक्य आहेत*:- योग्य समजुतींनी बांधलेला विवाह हा दोघांच्या स्वप्नांना बळ देतो, गळा घालून थांबवत नाही. दोघांनी मिळून आयुष्य घडवण्याचा मार्ग शोधता येतो – करिअर, प्रवास, छंद, सर्जनशीलता सगळं करता येतं.*संवाद हा सर्व प्रश्नांचा उपाय आहे*:- जर भीती वाटतेय, तर ती व्यक्त करा. पालकांशी, मित्रांशी, समुपदेशकांशी बोला. मनातील संभ्रम कमी होतात आणि निर्णय अधिक स्पष्ट होतो.विवाहाची भीती वाटणं हा अपराध नाही, पण ती फक्त भीती म्हणून मनात ठेवणं मात्र घातक आहे. विचार करा, समजून घ्या, अनुभव घ्या आणि मग निर्णय घ्या. लग्न हा शेवटचा नाही, तर नवीन सुरुवातीचा टप्पा असतो.जीवन सुंदर आहे – आणि दोन माणसांनी ते सुंदर करण्याचा प्रयत्न केला, तर ते अद्भुत होऊ शकतं!*पण खरं पाहिलं तर…**“Life is an adjustment.”*जगणे हे स्वयंभू आहे का? नाही. प्रत्येक दिवस, प्रत्येक क्षण हा बदल स्वीकारण्याचाच एक भाग आहे.आपण शाळा, कॉलेज, नोकरी, घर, मित्र, समाज – सर्व ठिकाणी सामंजस्य करतो.मग विवाहात का नाही?विवाह म्हणजेच त्याग नव्हे, तर परस्पर समजून घेतलं जाणं आहे.प्रत्येक नातं हे “परफेक्ट” नसतं, पण “परिपक्व” असू शकतं – आणि यासाठी संवाद, समजूत आणि थोडं-थोडं स्वतःला बदलणं आवश्यक असतं.*जीवन जगणं ही सुद्धा एक कला आहे…*कला ही सहजसाध्य नसते – ती साधावी लागते, घडवावी लागते.आयुष्यही तसंच आहे. सुख-दुःख, चढ-उतार, समाधान-अस्वस्थता – या सगळ्यांतून आपण आयुष्य घडवत असतो.विवाह ही त्या आयुष्याच्या कॅनव्हासवर एक रंग आहे – जर योग्य पद्धतीने वापरला, तर चित्र सुंदर बनतं.*विवाह म्हणजे –*दोन व्यक्तींमध्ये संवाद आणि समजुतीची सुरुवात.भिन्न मतांमध्ये साम्य शोधण्याची प्रक्रिया.कधी भांडणं, कधी गोडवा – पण शेवटी हात सोडून न जाण्याची प्रतिज्ञा.एकटेपणाला शेवट नसून, एकत्र वाटचाल करायचा निर्धार.*नव्या पिढीला काय सांगावं?*आजच्या तरुणांना विचार करण्याचा अधिकार आहे – आणि तो त्यांनी वापरायलाच हवा. पण त्या विचारातून भीती नव्हे तर साक्षर निर्णय निघायला हवा.लग्नाची घाई करू नका, पण त्याला टाळाच असेही नका.तुम्ही जसे आहात, तसे स्वीकारणारा जोडीदार शोधा – पण तुम्हीही त्याला तसेच स्वीकारा.*अपेक्षा*:- “कोणताही मजबूत पूल एकाच बाजूने बांधता येत नाही.”दोघे मिळून बांधत गेले, तर तो पूल पाण्याच्या पुरालाही तग धरतो.विवाह ही भीती नव्हे, ती एक संधी आहे – दुसऱ्या माणसाबरोबर आयुष्याची समृद्ध वाटचाल करण्याची.स्वप्न पूर्ण करायची असतील, तर दोघांनी मिळून आकाश गाठता येतं – फक्त हातात हात असावा लागतो.जीवन म्हणजे बदल, समजूत, आणि सामंजस्य – आणि त्यातूनच निर्माण होते खरी सुंदरता.विवाह म्हणजे त्या सुंदरतेच्या शोधात एक सवंगडी शोधणं. मग चिंता करता कशाला? *जगातलं सुंदर प्रेम , चिरकाल टिकणारं प्रेम, आयुष्यभर साथ देणारे असेल तर ते ” पती – पत्नीचं नातं!.*…राहुल डोंगरे…” पारस निवास ” शिवाजी नगर, तुमसर. जि.भंडारा. म. रा.मो. न.9423413826



