

शारदा विद्यालयात रक्षाबंधनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांत समता, पावित्र्य आणि सृजनशीलतेचा संदेश संजीव भांबोरेभंडारा-तुमसर येथील शारदा विद्यालय व कन्या कनिष्ठ महाविद्यालय, तुमसर येथेकार्यअनुभव–हस्तकला या उपक्रमांतर्गत रक्षाबंधनाच्या निमित्ताने “राखी बनविणे” हा विशेष कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये सृजनशीलता, नैतिक मूल्ये आणि सामाजिक समतेची भावना जागविणे हा होता.राखी या केवळ सजावटीच्या वस्तू नसून ती भाऊ-बहिणीच्या नात्यातील प्रेम, जिव्हाळा व जिवाभावाचे प्रतीक आहे, हा संदेश विद्यार्थ्यांनी मनापासून अनुभवला. विद्यार्थी व विद्यार्थिनी – दोघांनीही राखी तयार केली, हे दृश्य समाजातील लिंगसमतेचा आदर्श ठरले. पवित्र सणाचे महत्त्व प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावे व समाजात नैतिकतेची जपणूक व्हावी, हा दृष्टीकोन यामागे होता.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य राहुल डोंगरे होते. त्यांनी विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचे आणि सहभागाचे मनापासून कौतुक करताना, “या उपक्रमातून समाजात समतेचा मार्ग प्रशस्त होतो,” असे प्रतिपादन केले.शालेय कार्यक्रमांतर्गत शिक्षकवृंद ज्योती बालपांडे, दीपक गडपायले, संजय बावनकर, श्रीराम शेंडे, विद्या मस्के, नितुवर्षा मुकुर्णे, प्रीती सेलोकर, रूपराम हरडे,अशोक खंगार,अंकलेश तिजारे, सुकांक्षा भुरे,अतुल भिवगडे, बेनिता रंगारी, दीपक बालपांडे, नारायण मोहनकर आदिनी उत्साहाने सहभाग घेतला. विद्यार्थ्याना विशेष मार्गदर्शन केले.या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या गुणांना योग्य वाव मिळाला असून, शहरात या उपक्रमाची प्रशंसा होत आहे. रक्षाबंधनासारख्या पवित्र सणाच्या निमित्ताने सृजनशीलता, पावित्र्य आणि समाजिक एकतेचा संदेश देण्याचा हा उपक्रम नक्कीच प्रेरणादायी ठरला आहे.



