
१४ ऑगस्टला साकोली येथील ऐतिहासिक शाळेत शानदार लोकार्पण सोहळा नव्या वर्गखोलीचे लोकार्पण, नविन मंजूर वर्गाखोलींचे भुमिपूजन आणि वृक्ष दिंडी पालक मेळावा संजीव भांबोरेभंडारा -ब्रिटिशकालीन भंडारा जिल्ह्यातील सन १८६० पूर्वी स्थापित सर्वात जूनी दुसरी जनपद शाळा, व आजची “हायस्पीड” व आज कॉन्व्हेन्टलाही मागे टाकणारी आजची जिल्हा परिषद केंद्रीय उच्च प्राथ. शाळा क्र. १ ( सेमी इंग्लिश ) गणेश वार्ड साकोली येथील ऐतिहासिक शाळेत आलीशान वर्गखोलीचे लोकार्पण आणि अजून आधुनिक दुमजली वर्गखोल्यांचे भुमिपुजन सोहळा गुरूवार १४ ऑगस्टला हा सोहळा संपन्न होत आहे. विशेष म्हणजे येथे त्या दिवशी शाळा व्यवस्थापन समिती व शाळा प्रशासन वतीने अतिथींचा सत्कार सोहळा, वृक्ष दिंडी आणि पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या ऐतिहासिक १८६० साली स्थापन शाळेत कितीतरी थोर पुढारी, स्वातंत्र्य संग्राम सैनिक, ब्रिटिशकालीन राजवटातील तहसिलदार, नायब तहसीलदार, विचारवंत, भुतपूर्व आमदार खासदारांनी येथे शिक्षण घेतले आहे ही मुख्य शहर गणेश वार्ड साकोलीसाठी अत्यंत गौरवशाली बाब आहे. आज या शाळेचा “एक्टिव्ह” शिक्षक स्टॉफने व जागृत शाळा व्यवस्थापन समितीने जणू कायापालट करून ठेवला आहे. नुकतेच येथे आमदार नाना पटोले व खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांच्या प्रयत्नामुळे झालेल्या सुसज्ज वर्गखोलीचे लोकार्पण व नविन दुमजली वर्गखोलीचे भूमिपूजन सोहळा ( गुरू. १४ ऑगस्ट ) ला सकाळी ११ ला संपन्न होत आहे. येथे वृक्ष दिंडी व पालक मेळावा आयोजित करण्यात आला आहे. याप्रसंगी उदघाटक खासदार डॉ. प्रशांत पडोळे, अध्यक्ष आमदार नाना पटोले, अतिथीगण वि. प. आमदार अभिजीत वंजारी, माजी आमदार डॉ. हेमकृष्ण कापगते, उपविभागीय अधिकारी स्वाती देसाई, शिक्षण सभापती भंडारा नरेश ईश्वरकर, जि. प. सभापती शितल राऊत, तहसिलदार निलेश कदम, पं. स. सभापती ललित हेमणे, खंड विकास अधिकारी पी. व्ही. जाधव, उपसभापती करूणा वालोदे, नगरपरिषद मुख्याधिकारी मंगेश वासेकर, पोलीस निरीक्षक एम. पी. आचरेकर, पर्यावरण प्रेमी किरण पुरंदरे, जि. प. स. मदन रामटेके, गटशिक्षणाधिकारी विजय आदमने, केंद्र प्रमुख अर्जून मेश्राम, अभियंता रमेश भेंडारकर यांसह अनेक मान्यवर हजर असतील. या केंद्र शाळेत यावेळी विद्यार्थ्यांची नव्या जिल्हा परिषद आधुनिक ब्लेझर गणवेशात वृक्ष दिंडी काढण्यात येईल आणि शाळेत पालक मेळाव्याचे सुद्धा आयोजन करण्यात आले आहे. या मुख्य शहर साकोलीतील शानदार सोहळ्याला जास्तीत जास्त पालक जनतेने उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक डी. डी. वलथरे, सहाय्यक शिक्षकवृंद सी. एम. बोरकर, एम. व्ही. बोकडे, टी. आय. पटले, शालिनी राऊत, चित्ररेखा इंगळे, श्रद्धा औटी, भुमेश्वरी गुप्ता आणि शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष हेमंत भारद्वाज, उपाध्यक्ष हिमा राऊत, सदस्यगण शिशुपाल क-हाडे, आशिष चेडगे, भागवत लांजेवार, दिलीप झोडे, रिता शहारे, पुनम मेश्राम, वैशाली कापगते, दिपाली राऊत व पोषण आहार मदतनीस रेषमा कोवे, कविता बावणे, छन्नू मडावी यांनी केले आहे.



