


शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांकरिता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर येथील निवासस्थानासमोर बसणार होते आज आमरण उपोषणाला माजी समाज कल्याण सभापती चंद्रशेखर टेंभुर्णे यांच्यासह शेतकऱ्यांना दिघोरी नाका पोलिसांनी केली अटकसंजीव भांबोरे भंडारा -आज दिनांक 14 आगस्ट 2025 ला रोज गुरुवार सकाळी 9 वाजता लाखांदूर वरून शेतकऱ्यांच्या विविध मागण्या घेऊन आज माजी समाज कल्याण सभापती चंद्रशेखर टेंभुर्णे व शेतकरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानासमोर आमरण उपोषणास बसणार होते. परंतु रस्त्यातच दिघोरी नाका येथील पोलिसांनी त्यांना अडवून सकाळी 9.30 वाजता अटक केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणूक दरम्यान पक्षाच्या घोषणापत्र मध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु अजून पर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली नाही .अतिवृष्टी अ,वकाळी पाऊस, नैसर्गिक आपत्ती ,धान उत्पादन वाढता खर्च अशा अनेक कारणाने राज्यातील शेतकरी कर्जबाजारी होऊन शेतकरी आत्महत्याचे प्रमाण अधिकच वाढत आहे .विधान मंडळाच्या सन 2024 च्या हिवाळी अधिवेशनात नोंदणीकृत शेतकऱ्यांनी धान विक्री केली असो किंवा नसो अशा धान उत्पादकांना हेक्टरी 20,000 रुपये याप्रमाणे प्रोत्साहन पर राशी बोनस देण्याची घोषणा केली होती व दिनांक 25 मार्च 2025 रोजी राशी देण्यास चे पत्रक सुद्धा काढण्यात आले होते. परंतु अजून पर्यंत नोंदणीकृत शेतकऱ्यांना बोनसचे पैसे देण्यात आले नाही .बोनस चे पैसे तात्काळ नोंदणीकृत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात यावे या प्रमुख मागणीसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर येथील निवासस्थानासमोर आज 14 ऑगस्ट 2025 पासून धान उत्पादक शेतकऱ्यांचे आमरण उपोषण सुरू करण्यात येणार होते. त्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये नागपूर अधिवेशनात केलेल्या घोषणेप्रमाणे धान उत्पादन नोंदणी कृषी शेतकऱ्यांना तात्काळ बोनस देण्यात यावे ,उन्हाळी धान्याचे चुकारे देण्यात यावे व धान खरेदीची मुदत वाढविण्यात यावी याकरिता आजपासून आमरण उपोषण करण्यात येणार होते. परंतु त्यांना दिघोरी नाका ( लाखांदूर तालुका) पोलिसांनी अटक करून शेतकऱ्यांची मुस्कुटदाबी केलेली आहे. शेतकऱ्यांना आश्वासन देऊन सरकार पूर्ण करीत नसेल फक्त मतांसाठी शेतकऱ्यांचा वापर करीत असेल तर याला आपण काय जुमलेबाजी म्हणावे काय? असा प्रश्न शेतकऱ्यांमध्ये निर्माण होतो. शेतकरी शेतामध्ये राब राब राबून धान्याचे उत्पादन करीत असतो त्यालाच त्याचे मूल्य कळत असते. खुर्चीवर बसून पैसे कमावणाऱ्याला त्याची काय किंमत! शेतकऱ्यांनी अन्नधान्याची उत्पादन केले नाही तर खुर्चीवर बसून रुपये मोजणारा पैसे खाणार ? की नोटांच्या गुंडऱ्या करून तोंडात खाणार ? असाही प्रश्न निर्माण होतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस बलाचा वापर करून शेतकऱ्यांचे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केल्याचे बोलले जात आहेत.



