
मुख्यमंत्र्याच्या घरासमोर जाण्यापूर्वीच चंद्रशेखर टेंभुर्णे व शेतकऱ्यांना अटक.दिघोरी पोलीस ठाण्यातच ठिय्या आंदोलन अखेर लेखी आश्वासनानंतर जिल्हापणन अधिकारी यांच्या मार्फत उपोषणकर्त्यांना लिंबू पाणी पाजून आंदोलन मागे संजीव भांबोरेभंडारा -धान उत्पादक नोंदणीकृत शेतकऱ्यांना बोनस देण्यात यावे, शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करावे, उन्हाळी धानाचे पैसे तात्काळ देण्यात यावे व उन्हाळी धान खरेदी करावे या प्रमुख मागण्यांसाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खाजगी निवासस्थान नागपूर येथे दिनांक 14/ 8/ 2025 पासून आमरण उपोषण आंदोलन करण्याचे निवेदन माजी समाज कल्याण सभापती चंद्रशेखर टेंभुर्णी यांनी दिले होते. मुख्यमंत्र्याच्या निवासस्थानासमोर नागपूर येथे जाण्यासाठी निघालेल्या माजी सभापती चंद्रशेखर टेंभुर्णे व इतर शेतकऱ्यांना दिघोरी पोलिसांनी खोलमारा येथे वाहनात बसत असतानाच सकाळी 8 वाजता दिघोरी पोलिसांनी अटक करून पोलिसांना दिघोरी येथे नेले. दिघोरी पोलीस स्टेशन येथे मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही पोलीस स्टेशन येथेच आमरण उपोषण आंदोलन सुरू करू असा आक्रमक पवित्रा घेतला. व पोलीस स्टेशन येथेच आमरण उपोषणासाठी बसले. आंदोलकाची आक्रमकता पाहून तहसीलदार वैभव पवार व पोलीस निरीक्षक प्रमोद शिंदे यांनी जिल्हाधिकारी भंडारा व जिल्हा पणन अधिकारी यांच्याशी भ्रमणध्वनी द्वारे संपर्क साधून भूमिका समजावून सांगितले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पणन अधिकारी एस. बी. चंद्र हे दिघोरी पोलीस स्टेशनला दुपारी 1 वाजता च्या दरम्यान पोहोचले. आंदोलन कर्त्याची चर्चा करून त्यांनी समस्या ऐकून घेतल्या. वरिष्ठांशी भ्रमणध्वनीद्वारे चर्चा करून आंदोलनकर्त्यांना त्यांच्या मागण्या पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन दिले. त्यानंतर जिल्हा पणन अधिकारी यांचे हस्ते उपोषण करते माजी सभापती चंद्रशेखर टेंभुर्णी व इतर कार्यकर्त्यांना निंबू पाणी पाजून उपोषणाची सांगता करण्यात आली. सोबत लाखांदूर चे तहसीलदार वैभव पवार व पोलीस निरीक्षक प्रमोद शिंदे उपस्थित होते. खरीप हंगाम 2024 25 मधील नोंदणीकृत धान उत्पादक शेतकऱ्यांचे बोनस दिनांक 8/8/2025 पासून प्रत्येक संस्थेची शेतकऱ्यांची 20% तपासणी करून आजपर्यंत 110 संस्थांचे बोनस वाटप करण्यात आले आहे. उर्वरित संस्थांचे 20% तपासणी करून बोनस वाटप करणे सुरू आहे. रब्बी हंगाम 2024 /25 मधील माहे मे , जून 2025 या महिन्याचे धानाचे पेमेंट वाटप झालेले आहे. महेश जुलै 2025 या महिन्याचे पेमेंट शासनाकडून जमा झाल्यास दुसऱ्याच दिवसापासून पेमेंट वाटप सुरू होईल. जिल्हा पणन कार्यालयामध्ये याबाबत सर्व नियोजन झालेले आहे. रब्बी हंगामातील धान खरेदी पासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांसाठी घाण खरेदीची मुदत (लिमिट) नोंदणीसाठी पत्रव्यवहार प्रधान कार्यालयाला केली आहे. शासनाकडून घाण खरेदीसाठी मुदत दिनांक 31/ 8/ 2025 पर्यंत वाढवून मिळावी तसेच भंडारा जिल्ह्यासाठी दहा लाख लिमिट मिळावी. म्हणजेच भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांची घानाची खरेदी होऊ शकते. याबाबत शासनाला पत्रव्यवहार व आपले पत्र सोबत जोडून पाठवीत आहोत. त्यानंतर शासनाकडून आदेश निर्गमित होताच आपणास कळविण्यात येईल अशाच आशयाचे पत्र माननीय सर व्यवस्थापक सो (राज्य शासन खरेदी) प्रधान कार्यालय मुंबई _०९ यांचे नावे पाठवून त्याची प्रत माजी सभापती चंद्रशेखर टेंभुर्णे यांना जिल्हा पणन अधिकारी एस बी चंद्र यांनी दिली. अटक झालेल्या मध्ये चंद्रशेखर टेंभुर्णे, उत्तम भागडकर, मुकेश कोरे, श्रीहरी भंडारकर, व्यंकट मेश्राम गुलाब कापसे, कृष्णराव थूलकर, हो मराज डोये, काशिनाथ हत्ती मारे, दिनेश टेंभुर्णे, नानाजी टेंभुर्णे, राकेश लाडे, राजू झोडे, मीताराम हत्ती मारे, मंगेश वालदे, देवचंद कावळे, गोपाल झोडे, अश्विन टेंभुर्णे, राकेश चंदन बावणे, दुधराम कांबळे व मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.



