
साकोलीत प्रथम स्थानिक पत्रकारांसाठी सरसावली “स्थानिक निवासी संघटना” स्वातंत्र्यदिनी दोन्ही महाराष्ट्र शासन मान्य पत्रकार संघाच्या जागेत कार्यालयाचे भूमिपूजन व फलकाचे अनावरण संपन्न संजीव भांबोरेभंडारा -साकोली येथील स्थानिक निवासी युवा बेरोजगार तरुणांना रोजगार करण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यासाठी रणशिंग फुंकणारी “साकोली सेंदूरवाफा स्थानिक निवासी संघटना” यांनी आज १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी अगोदर येथील स्थानिक व शासनमान्य पत्रकार संघाच्या कार्यालयासाठी जागा उपलब्ध करून दिली ही गौरवाची बाब. आज राष्ट्रीय महामार्गावर महाराष्ट्र शासन मान्य प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य आणि महाराष्ट्र पत्रकार संघांच्या नियोजित कार्यालयाच्या जागेवर भूमिपूजन व फलकाचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला. साकोली सेंदूरवाफा स्थानिक निवासी संघटनेने आज स्वातंत्र्यदिन दिवशीच स्थानिक निवासींचे स्वातंत्र्याच्या हक्कासाठी हे अभिनव व आवश्यक विषयाची सुरूवात केली. आणि प्रथम येथील स्थानिक निवासी पत्रकारांना वृत्तसंकलन, वृत्तपत्र संग्रह व वाचन कक्षासाठी जनहितार्थ कार्यालयासाठी हक्काची जागा उपलब्ध करून दिली हे विशेष. या कार्यालयात सुद्धा स्थानिक निवासी सुशिक्षित युवक तरूण बेरोजगार यांना रोजगार करण्यासाठी त्यांच्याच गावात जागा उपलब्ध करून देण्यासाठी येथे गोरगरीब युवकांची नोंदणी शुल्क १० रू. व त्यांना दूकान गाळे मिळण्यासाठी अर्ज आवेदन फॉर्म किंमत ११/- रू असे स्विकारण्याचे स्थळ राहणार आहे असे स्पष्ट केले. सदर कार्यक्रमाला महाराष्ट्र पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष शिवशंकर टेंभरे, संघटनेचे अध्यक्ष प्रमोद मेश्राम, उपाध्यक्ष सपन कापगते, अनिल कापगते, सचिव प्रदीप मासुरकर, कोषाध्यक्ष गणेश बोरकर, मार्गदर्शक महेश पोगळे, महाराष्ट्र पत्रकार संघ जिल्हा उपाध्यक्ष डी. जी. रंगारी, प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष आशिष चेडगे, सहसचिव किशोर बावणे, सदस्य जितेंद्र उईके, हरीशचंद्र सोनवाने, प्रसारण प्रमुख मनिषा काशिवार, पत्रकार मदन कमाने, जयकृष्ण डुंभरे, झनकलाल लांजेवार, युगांतर बारसागडे, अमोल हत्तीमारे, महिला सामाजिक कार्यकर्ता शितल नागदेवे, कल्पना सांगोडे, विशाल साखरवाडे, ज्योती मेश्राम, स्वप्निल गजभिये, उत्तमा गडपायले, मयूर गजापूरे, राजेश मेश्राम, मनिष राऊत, विश्वकर्मा सोनवाने, सचिन सुर्यवंशी, दामोधर सुर्यवंशी, मोहन फुलबांधे, विशाल केरझरे, दिगंबर सुर्यवंशी, मुकेश गजभिये यांसह साकोली सेंदूरवाफा शहरातील अनेक स्थानिक युवा सुशिक्षित बेरोजगार हजर झाले होते. कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना साकोली सेंदूरवाफा स्थानिक निवासी संघटनातील पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, शहरात शासकीय भूखंडावर अतिक्रमणे करून ते किरायाने देणे, बेकायदेशीरपणे विकणे असा व्यवसाय धंदा करू दिला जाणार नाही. कारण या संतापजनक प्रकाराने स्थानिक निवासी गोरगरीब होतकरू युवकांना त्यांच्याच गावात जागा मिळणे कठीण झाले आहे. लवकरच अशे प्रकार उजेडात आणले जातील आणि आढळून आल्यास संघटनेच्या वतीने आक्रमक पवित्रा घेतला जाईल असे प्रतिपादन केले. या अती महत्वाच्या बैठकीत सामाजिक युवा कार्यकर्ता सपन कापगते नवनिर्वाचित उपाध्यक्ष यांचा संघटनेकडून सत्कार व अभिनंदन करण्यात आले.



