
नामदार संजयजी सावकारे साहेब पालकमंत्राच्या हस्ते ” “नुपुल शहारे आणि बालिका ठवकर यांचा सत्कार*संजीव भांबोरेभंडारा- तुमसर स्थानिक शारदा विद्यालय व कन्या कनिष्ठ महाविद्यालय, बजाज नगर, तुमसर मधील विद्यार्थी-विद्यार्थिनींनी पुन्हा एकदा उत्कृष्ट यश संपादन करून नाव उज्ज्वल केले आहे.*भंडारा जिल्हा पोलीस दल आयोजित “जागर – नशामुक्ती अभियान २०२५*” अंतर्गत झालेल्या चित्रकला स्पर्धेत*विद्यार्थी नुपुल अरुण शहारे* यांनी प्रथम क्रमांक, तर विद्यार्थिनी *कु.बालिका कृष्णा ठवकर* हिने द्वितीय क्रमांक पटकावून उल्लेखनीय कामगिरी केली.या यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा १५ ऑगस्ट ला स्वातंत्र्य दिनी भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार श्री. संजयजी सावकारे यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.कार्यक्रमास खासदार मा.डॉ. प्रशांत पडोळे, आमदार व माजी पालकमंत्री मा.डॉ. परिणयजी फुके, मा.सावंत कुमार साहेब I.A.S. मा.नुरुल हसन साहेब I.P.S.पोलीस अधिक्षक भंडारा, Ad.S.P.मा.निलेश मोरे साहेब तसेच I.P.S.मा.मयंक माधव साहेब S.D.P.O पोलीस स्टेशन तुमसर व पोलीस निरीक्षक संजयजी गायकवाड आदरपूर्वक उपस्थित होते.या प्रसंगी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.शारदा विद्यालय व कन्या कनिष्ठ महाविद्यालय तुमसरच्या या यशामुळे विद्यार्थी, पालक व शिक्षकवर्ग यांच्यात आनंदाचे वातावरण असून भविष्यातील वाटचालीसाठी प्रेरणादायी ठरले आहे.या Star विद्यार्थ्यांचे पूजा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष महाबीरप्रसादजी अग्रवाल, सचिव रामकुमारजी अग्रवाल,मुख्याध्यापक राहुल डोंगरे ,ज्योती बालपांडे, दिपक गडपायले, श्रीराम शेंडे, संजय बावनकर, नितुवर्षा मुकुर्णे, विद्या मस्के,प्रीती भोयर, अशोक खंगार, रूपराम हरडे, सुकांक्षा भुरे, बेनिता रंगारी,अतुल भिवगडे, अंकलेश तिजारे, सारिका आथोडे, नारायण मोहनकर,दीपक बालपांडे आदीनी अभिनंदन केले.



