Thursday, January 15, 2026

National

spot_img

पत्रकारांचे महामंडळ स्थापनेसाठी अ.भा.ग्रा. पत्रकार संघ लढा देणार

पत्रकारांचे महामंडळ स्थापनेसाठी अ.भा.ग्रा. पत्रकार संघ लढा देणारअ.भा.ग्रा. पत्रकार संघाचे अध्यक्ष मनोहर सुने यांची माहितीचांदूर रेल्वेत पंधरवाडा कार्यक्रमाचा उत्साहात समारोप अमरावती – सचिन ढोके ग्रामीण भागातील पत्रकारांच्या समस्यांसाठी अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ नेहमीच तत्पर आहे. अशातच आता पत्रकारांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून विमा कवचची सुविधा सर्व सभासदांकरिता सुरू केली आहे. तर अ.भा.ग्रा. पत्रकार संघ आता साप्ताहिक संपादक मंच सुध्दा स्थापन करणार आहे. याशिवाय महाराष्ट्र सरकारने पत्रकारांच्या कल्याणासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्याच्या मागणीसाठी अखिल भारतीय पत्रकार संघ कार्यरत असून वेळ पडल्यास मुंबई येथे आझाद मैदानावर आंदोलनाची सुद्धा भूमिका घेऊ अशी माहिती अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष मनोहर सुने यांनी दिली. अ.भा.ग्रा. संघटनेचे केंद्रीय व राज्य पदाधिकाऱ्यांचे वाढदिवसाच्या निमित्याने राज्यभरात १ ते १५ ऑगस्टपर्यंत (पंधरवाडा) विविध उपक्रमांचे आयोजन केले. या उपक्रमाचा समारोपीय सोहळा 17 ऑगस्ट रोजी चांदूर रेल्वे येथील संताबाई यादव मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आला होता.सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थापक अध्यक्ष मनोहर सुने होते. तर प्रमुख अतिथी म्हणून प्रसिद्ध उद्योजक हाजी अब्दुल हमीदभाई, उद्योजक कैलास गिरोळकर, दिपक गोरडे, अ.भा.ग्रा. पत्रकार संघाचे केंद्रीय कार्याध्यक्ष युसुफ खान, केंद्रीय सरचिटणीस अशोक पवार, केंद्रीय उपाध्यक्ष राजेंद्र भुरे, प्रदीप जोशी, केंद्रीय संपर्कप्रमुख अरुण कुलथे, महाराष्ट्र उपाध्यक्ष सुरेश ढवळे, ज्येष्ठ पत्रकार प्रभाकर भगोले, प्राचार्य विश्वास दामले, केंद्रीय सदस्य बाळासाहेब सोरगिवकर, केंद्रीय कार्यालय प्रमुख बाबाराव खडसे, केंद्रीय प्रसिध्दी प्रमुख सागर सवळे, संपादक राहुल कविटकर, विदर्भ सचिव सचिन ढोके, जिल्हा संपर्कप्रमुख ओमप्रकाश कुऱ्हाडे, जिल्हा पदाधिकारी अनिल साखरकर, प्रदेश उपाध्यक्ष संजय पोफळे, प्रदेश सदस्य उत्तमराव गावंडे आदींची उपस्थिती होती. सर्वप्रथम आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यानंतर प्रास्ताविक केंद्रीय सदस्य बाळासाहेब सोरगिवकर यांनी केले. यानंतर ज्येष्ठ पत्रकार प्रभाकर भगोले व प्राचार्य विश्वास दामले यांनी मनोगत व्यक्त केले. यात उत्कृष्ट कार्य केलेल्या पत्रकारांचा सत्कार करण्यात आला. तर केंद्रीय कार्याध्यक्ष युसुफ खान यांचा वाढदिवस असल्यामुळे अ.भा.ग्रा. पत्रकार संघाचे उपस्थित सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून त्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन केंद्रीय चिटणीस प्रा. रवींद्र मेंढे यांनी केले. या कार्यक्रमाला जिल्ह्यातील सदस्य श्याम शिंदे, उमेश चौकडे, सुनिल घोरमाडे, प्रशिक शापामोहन, अमोल खाकसे, रामकृष्ण धांदे, संतोष वाघमारे, महेंद्र काळे, अमोल गवळी, विवेक राऊत, निशिकांत देशमुख, राजीव शिवणकर, इरफान पठान, शहेजाद खान, राहुल देशमुख, रितेश मुंधडा, विनय गोटेफोडे, प्रकाश रंगारी, पियुष ठोंबरे, संजय डगवार, अजय गावंडे, अमर घटारे,धिरज नेवारेे,रवि कलाने, मनिष खुणे, प्रशांत सिसोदिया यांसह अमरावती जिल्ह्यातील पत्रकार बंधू उपस्थिती होती. अ.भा.ग्रा. पत्रकार संघाचे हिंगोली येथील आजीवन सदस्य अब्दुल हाफिज बागवान यांचे निधन झाल्याचे त्यांना कार्यक्रमाच्या शेवटी भावपुर्ण श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.

International

RELATED ARTICLES