Thursday, January 15, 2026

National

spot_img

देशभक्तीची रुजवण करणारा अनोखा सामाजिक उपक्रम उपसरपंच राजेंद्र दरेकर यांच्या आयोजनातून संपन्न

देशभक्तीची रुजवण करणारा अनोखा सामाजिक उपक्रम उपसरपंच राजेंद्र दरेकर यांच्या आयोजनातून संपन्न संजीव भांबोरे महाराष्ट्र प्रतिनिधीसणसवाडी (ता. शिरूर) – मोबाईल आणि इंटरनेटच्या जगात हरवून गेलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा निसर्गाशी जोडून त्यांच्यात सामाजिक जाणीव निर्माण करण्यासाठी सणसवाडीचे उपसरपंच राजेंद्र दरेकर यांच्या संकल्पनेतून एका अनोख्या निसर्ग सहलीचे आयोजन करण्यात आले होते. सणसवाडीतील विविध शाळांमधील हजारो विद्यार्थ्यांनी श्री क्षेत्र नरेश्वर महाराज मंदिर परिसरात वनभोजन, मैदानी खेळ आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचा मनसोक्त आनंद घेतला.त्यांच्यात सामाजिक जाणीव निर्माण करण्यासाठी सणसवाडीचे उपसरपंच राजेंद्र दरेकर यांच्या संकल्पनेतून एका अनोख्या निसर्ग सहलीचे आयोजन करण्यात आले होते. सणसवाडीतील विविध शाळांमधील हजारो विद्यार्थ्यांनी श्री क्षेत्र नरेश्वर महाराज मंदिर परिसरात वनभोजन, मैदानी खेळ आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचा मनसोक्त आनंद घेतला.अनोख्या निसर्ग सहलीचे आयोजनया सहलीचे आयोजन उपसरपंच राजेंद्र दरेकर आणि सरपंच रुपाली दगडू दरेकर यांनी केले होते. यामध्ये सणसवाडीतील जिल्हा परिषद शाळा (सणसवाडी व वसेवाडी), माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, नॉवेल प्राईड इंग्लिश मीडियम स्कूल, जिजामाता इंग्लिश मेडियम स्कूल, जयवंत पब्लिक स्कूल आणि अंजली इंटरनॅशनल स्कूलमधील हजारो विद्यार्थी सहभागी झाले होते.वृक्षारोपण आणि मैदानी खेळांची धमाल – सहली दरम्यान, विद्यार्थ्यांनी हरिनामाचा तसेच प्रबोधनपर अभंगाचा आनंद घेतला. टाळ-मृदंगाच्या गजरात नरेश्वर महाराजांचे दर्शन घेतल्यानंतर, विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि मैदानी खेळांमध्ये भाग घेतला. यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद आणि उत्साह दिसून आला. या उपक्रमाचा एक भाग म्हणून वृक्षारोपण अभियानही राबवण्यात आले.’भावी पिढी घडवण्यासाठी छोटासा प्रयत्न’ – या उपक्रमाविषयी बोलताना उपसरपंच राजेंद्र दरेकर म्हणाले, “आजची पिढी मोबाईलच्या जगात अडकली आहे. त्यांना निसर्गाशी जोडून मैदानी खेळांच्या माध्यमातून शारीरिक तंदुरुस्ती जपण्याची प्रेरणा देणे हा यामागचा उद्देश आहे. मन, मनगट आणि मेंदू यांचा समतोल साधत सामाजिक बांधिलकी जपणारी देशभक्त पिढी घडवण्याचा हा एक छोटासा प्रयत्न आहे.” या कार्यक्रम प्रसंगी सनग्लो क्रिकेट स्टेडियमचे सोमनाथ साहेबराव दरेकर,ग्रामपंचायत सदस्या तनुजा दरेकर , मार्केट कमिटीचे माजी सदस्य दत्तात्रय हरगुडे,काँग्रेसचे वैभव यादव ,उद्योजक नवनाथ रामचंद्र हरगुडे ,ताराचंद दरेकर ,अशोक हरगुडे, विद्याधर दरेकर ,अतुल साठे, सोमनाथ हरगुडे ,तानाजी दरेकर ,सुरज दरेकर, प्रदीप दरेकर ,रवींद्र दरेकर ,अमोल शेळके ,विजय गव्हाणे ,उद्योजक रामदास दरेकर,वसेवाडी शाळेचे मुख्याध्यापक संतोष गोसावी,मुख्याध्यापिका राधिका मेंगावडे,जयवंत पब्लिक स्कूलचे मुख्याध्यापक शशी प्रधान,जिजामाता इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका सारिका गावडे,नोव्हेल प्राइड स्कूलचे मुख्याध्यापक प्रमोद चव्हाण, अंजली इंटरनॅशनल स्कूलच्या मुख्याध्यापिका सुरेखा दाणे यांच्यासह अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

International

RELATED ARTICLES