
पोलीस स्टेशन अड्याळ येथे गणेश उत्सव संबंधाने बैठक संपन्न उपविभागीय पोलीस अधिकारी मनोज सिडाम यांनी केले मार्गदर्शनसंजीव भांबोरेभंडारा –पवनी तालुक्यातील अड्याळ येथे उपविभागीय पोलीस अधिकारी मनोज सिडाम पवनी यांच्या प्रमुख उपस्तितीत आगामी श्रीगणेश उत्सव 2025 संबंधाने आज दिनांक 21/8/2025 रोजी 10/30 वा. ते 12/25 वा. पावेतो पोलीस स्टेशन परिसरातील सर्व गणेश मंडळ पदाधिकारी, पोळा, मारबत, ईद – ए – मिलद शांतता कमेटी सदस्य तसेच पो. स्टे. परिसरातील सर्व डि.जे अँड साउंड सिस्टीम पदाधिकारी यांची बैठक आयोजीत करण्यात आली. सदर बैठकीत उपस्थित डि.जे अँड साउंड सिस्टीम पदाधिकारी यांना शासनांकडून प्राप्त ध्वनी प्रदुषण नियमांचे तंतोतंत पालन करावे, वेळेबाह्य व नियमबाह्य वाजवू नये, ध्वनीमर्यादेपेक्षा अधिक वाजवू नये, वादग्रस्त गाणे वाजवू नये, वाजविणा-या गाण्यांची आगाउ यादी प्राप्त करून घेणे, वाहनावर डिजे बसवतांना आरटीओ कडून रितसर परवानगी घेणे यासंबंधाने योग्य त्या मार्गदर्शक सुचना दिल्या. सदर बैठकीसाठी गणेश मंडळ, शांतता कमेटी सदस्य, मारबत पोळा, असे 100 ते 120 पदाधिकारी उपस्थित होते, ही बैठक अड्याळ येथील ठाणेदार धनंजय पाटील यांनी आयोजित केली होती.



