Friday, January 16, 2026

National

spot_img

भंडारा स्मशान भूमीत बौद्ध धर्मीयांना अंत्यसंस्कार करण्यास मनाई मुख्याधिकारी नगर परिषद यांनी आदेश काढून लावला फलकबौद्ध धर्मीय विविध धार्मिक व सामाजिक संघटनेनी जिल्हाधिकारी यांना दिले निवेदन – संजीव भांबोरेभंडारा -भारत हे एक धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य राष्ट्र आहे .भारतीय राज्यघटनेच्या कलम 25 ते 28 नुसार प्रत्येक भारतीयांना त्यांचे धार्मिक, उपासना व आचरण करण्याचे स्वातंत्र्य आहे .त्यानुसार शासनाने प्रत्येक शहरात व गावात त्यांच्या नागरिकांच्या अंत्यसंस्कारा करिता सार्वजनिक स्मशानभूमी निर्माण केल्या आहेत व या स्मशानभूमीची देखरेख व सुव्यवस्था करण्याची जबाबदारी स्थानिक नगर परिषद /ग्रामपंचायत यांच्याकडे सोपीली आहे .या दोन्ही संस्थांना त्यांच्या शहरातील/ गावातील नागरिकांच्या /लोकांच्या जन्म मत्यूची नोंद ठेवतच मृत्यूनंतर त्यांच्या अंत्यविधी व अंत्यसंस्काराची व्यवस्था करण्याचे कर्तव्य पार पाडावे लागते. परंतु नगरपरिषद भंडाऱ्याचे मुख्याधिकारी यांनी त्यावर मात करून व आपले कर्तव्य विसरून ‘भंडारा स्मशानभूमीत हिंदू धर्मीयाव्यतिरिक्त इतर धर्मीयांचा अंत्यविधी होणार नाही याची नोंद घ्यावी ‘अशा प्रकारचा फलक स्मशानभूमीत लावलेला आहे. त्यामुळे या वादग्रस् फलकामुळे बौद्ध धर्मीयांना स्मशानभूमीच नाही असे म्हणण्याची वेळ आली आहे. एवढेच नव्हे तर बौद्ध धर्मियांनी त्यांच्या घरातील पार्थिवाची विल्हेवाट सार्वजनिक रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी करावी काय ? हा ज्वलंत प्रश्न निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत नगरपरिषदेच्या त्या बेकायदेशीर फलकामुळे हिंदू आणि बौद्ध धर्मीयात वर्षानुवर्षे या स्मशानभूमीत होत असलेल्या अंत्यसंस्कारावरून तेढ निर्माण होऊन सामाजिक शांतता व सलोख्याला तडा जाऊ शकतो म्हणून वर्तमान गंभीर परिस्थितीचा विचार करून स्मशानभूमीत लावलेला व दोन धर्मीयात तेढ निर्माण करणारा फलक त्वरित काढण्याचे निर्देश जिल्हाधिकारी महोदय यांनी मुख्याधिकारी नगरपरिषद यांना देण्यात यावे. व त्यांना या बेकायदेशीर कृत्याबद्दल समजल द्यावी अशा मागणीचे निवेदन बौद्ध धर्मीय विविध धार्मिक व सामाजिक संघटनेच्या वतीने दिनांक 20 ऑगस्ट 2025 ला 5 वाजत देण्यात आले आहे. शिष्टमंडळात अमृत बन्सोड ,मन्साराम दहिवले, महेंद्र गडकरी, महादेव मेश्राम ,परमानंद मेश्राम, मोरेश्वर गेडाम, गुलशन गजभिये आहूजा डोंगरे, भावेश कोटांगले, कार्तिक मेश्राम, चंद्रशेखर खोब्रागडे ,सचिन गेडाम ,कपिला रामटेके, अरविंद काणेकर ,आर. आर . बन्सोड धर्मेंद्र,गोसावी इत्यादींच्या समावेश होता.

भंडारा स्मशान भूमीत बौद्ध धर्मीयांना अंत्यसंस्कार करण्यास मनाईभंडारा स्मशान भूमीत बौद्ध धर्मीयांना अंत्यसंस्कार करण्यास मनाई

Previous article
पुन्हा साकोली मुख्य शहराचे प्राचीन श्री विठ्ठल रखुमाई मंदिराचा जीर्णोद्धार होणारतान्हा पोळ्याला होणार भूमिपूजन व शुभारंभ सोहळा संजीव भांबोरे भंडारा- ब्रिटिशकालीन राजवटापासून असलेले साकोली तहसिल आणि तेच मुख्य शहर म्हणजे गणेश वार्ड. येथील ऐतिहासिक वैभव प्राप्त असलेल्या पुरातन मंदिराच्या जिर्णोद्धाराचे कार्य ईश्वरानेच काही होतकरू स्थानिक निवासींना जणु “आशिषं” म्हणजे आशिर्वादच दिला आहे. मागे ऐतिहासिक प्राचीन १३२ वर्ष जूने श्री गणपती मंदिराचे जिर्णोद्धार सोहळा झाला व या गणेशोत्सव नंतर नव्या मंदिराचे बांधकामाला सुरुवात केली जात आहे. असेच एक प्राचीन श्री विठ्ठल रखुमाई मंदिर हे त्या काळातील आमदार स्व. शामरावबापू कापगते यांच्या निवासस्थान परीसरात आजही जीर्ण अवस्थेत उभे आहे. येथे प्राचीन काळापासून त्या वेळचे शिक्षण महर्षी स्व. नंदलाल पाटील कापगते, स्व. भैयाजी पाटील कापगते, ब्रिटिशकालीन तहसिलदार स्व. शंकरराव शिवाजी अंदूलकर, स्वातंत्र्य संग्राम सैनिक स्व. उमराव सिंह जव्हेरी, जूने दिवाणी न्यायालय अधिक्षक स्व. रामचंद्र पाटील कापगते, स्व. पांडूरंगजी उजगांवकर, ब्रिटिशकालीन ठाणेदार अर्थात दरोगा स्व. संपतसिंह सिडाम आणि जूने व्यक्ती याच चौकात तान्हा पोळा भरवित असत. त्या काळात दिवे नसून चौकाचौकात रात्री प्रकाशासाठी मशाली ठेवल्या जात होत्या. ही माहिती मला मी ६ वीत असतांना माझे आजोबा स्व. शंकरराव शिवाजी अंदूलकर हे सन १९९४ ला रात्री जेवल्यानंतर झोपताना जुन्या गोष्टी सांगत असत. एवढे प्राचीन वैभव या गणेश वार्ड शहरात आहे म्हणूनच काही जागृत निवासींनी या श्री विठ्ठल रखुमाई मंदिराचा जीर्णोद्धाराचा जणू विडाच उचलला आहे. येथे उद्या शनिवार २३ ऑगस्टला सायं. ०५ वाजता त्याच तान्हा पोळा अविस्मरणीय आठवणी निमित्ताने या सुद्धा मंदिराचे जिर्णोद्धार पुजन सोहळा संपन्न केला जातो आहे. ही आपल्या ब्रिटिशकालीन राजवटातील सर्वात जूनी तहसिल साकोली शहरासाठी गौरवाची बाब आहे. या सोहळ्याला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन “प्राचीन मंदिर जिर्णोद्धार समिती” च्या जागृत स्थानिक जनतेने केले आहे.
Next article

International

spot_img

भंडारा स्मशान भूमीत बौद्ध धर्मीयांना अंत्यसंस्कार करण्यास मनाई मुख्याधिकारी नगर परिषद यांनी आदेश काढून लावला फलकबौद्ध धर्मीय विविध धार्मिक व सामाजिक संघटनेनी जिल्हाधिकारी यांना दिले निवेदन – संजीव भांबोरेभंडारा -भारत हे एक धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य राष्ट्र आहे .भारतीय राज्यघटनेच्या कलम 25 ते 28 नुसार प्रत्येक भारतीयांना त्यांचे धार्मिक, उपासना व आचरण करण्याचे स्वातंत्र्य आहे .त्यानुसार शासनाने प्रत्येक शहरात व गावात त्यांच्या नागरिकांच्या अंत्यसंस्कारा करिता सार्वजनिक स्मशानभूमी निर्माण केल्या आहेत व या स्मशानभूमीची देखरेख व सुव्यवस्था करण्याची जबाबदारी स्थानिक नगर परिषद /ग्रामपंचायत यांच्याकडे सोपीली आहे .या दोन्ही संस्थांना त्यांच्या शहरातील/ गावातील नागरिकांच्या /लोकांच्या जन्म मत्यूची नोंद ठेवतच मृत्यूनंतर त्यांच्या अंत्यविधी व अंत्यसंस्काराची व्यवस्था करण्याचे कर्तव्य पार पाडावे लागते. परंतु नगरपरिषद भंडाऱ्याचे मुख्याधिकारी यांनी त्यावर मात करून व आपले कर्तव्य विसरून ‘भंडारा स्मशानभूमीत हिंदू धर्मीयाव्यतिरिक्त इतर धर्मीयांचा अंत्यविधी होणार नाही याची नोंद घ्यावी ‘अशा प्रकारचा फलक स्मशानभूमीत लावलेला आहे. त्यामुळे या वादग्रस् फलकामुळे बौद्ध धर्मीयांना स्मशानभूमीच नाही असे म्हणण्याची वेळ आली आहे. एवढेच नव्हे तर बौद्ध धर्मियांनी त्यांच्या घरातील पार्थिवाची विल्हेवाट सार्वजनिक रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी करावी काय ? हा ज्वलंत प्रश्न निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत नगरपरिषदेच्या त्या बेकायदेशीर फलकामुळे हिंदू आणि बौद्ध धर्मीयात वर्षानुवर्षे या स्मशानभूमीत होत असलेल्या अंत्यसंस्कारावरून तेढ निर्माण होऊन सामाजिक शांतता व सलोख्याला तडा जाऊ शकतो म्हणून वर्तमान गंभीर परिस्थितीचा विचार करून स्मशानभूमीत लावलेला व दोन धर्मीयात तेढ निर्माण करणारा फलक त्वरित काढण्याचे निर्देश जिल्हाधिकारी महोदय यांनी मुख्याधिकारी नगरपरिषद यांना देण्यात यावे. व त्यांना या बेकायदेशीर कृत्याबद्दल समजल द्यावी अशा मागणीचे निवेदन बौद्ध धर्मीय विविध धार्मिक व सामाजिक संघटनेच्या वतीने दिनांक 20 ऑगस्ट 2025 ला 5 वाजत देण्यात आले आहे. शिष्टमंडळात अमृत बन्सोड ,मन्साराम दहिवले, महेंद्र गडकरी, महादेव मेश्राम ,परमानंद मेश्राम, मोरेश्वर गेडाम, गुलशन गजभिये आहूजा डोंगरे, भावेश कोटांगले, कार्तिक मेश्राम, चंद्रशेखर खोब्रागडे ,सचिन गेडाम ,कपिला रामटेके, अरविंद काणेकर ,आर. आर . बन्सोड धर्मेंद्र,गोसावी इत्यादींच्या समावेश होता.

भंडारा स्मशान भूमीत बौद्ध धर्मीयांना अंत्यसंस्कार करण्यास मनाईभंडारा स्मशान भूमीत बौद्ध धर्मीयांना अंत्यसंस्कार करण्यास मनाई

National

spot_img

International

spot_img
RELATED ARTICLES