
” संजीव भांबोरे महाराष्ट्र प्रतिनिधी भंडारा–“सद्ररक्षणाय खलनिग्रहणाय” महाराष्ट्र पोलीसांचे हे ब्रिद वाक्य साकोलीत खरे ठरले आहे. एका व्यक्तीच्या घरात जात मद्यपीने स्मार्टफोन पळविला. काही जनतेने त्याच्या खिशात मोबाईल पाहिले. मद्यपीने फोन कुणालातरी विकला. ते कुणाला विकला हे सांग म्हणून विनंती केली. तो ऐकला नाही. आणि तक्रारदाराने थेट “पोलीस हेल्पलाईन डायल ११२” वर फोन लावला. आणि क्षणार्धात त्या घटनास्थळी पोलीस वाहन उभे झाले. ही अत्यंत जलदगतीची ऑनलाईन दखल घेतली आहे साकोली पोलीस ठाणे येथील “डायल ११२” वर बसलेल्या कर्तव्यदक्ष पोलीस नायकांनी. आणि खरंच जनतेच्या तात्काळ मदतीसाठी “महाराष्ट्र पोलीस” सदैव सेवेत आहेत हे दाखवून दिले आहे ही गौरवाची बाब. प्रकरण असे की, मुख्य शहर साकोली गणेश वार्ड येथील रहिवासी अशोक कोटांगले वय ५७ हे ( सोम. २५ ऑगस्ट ) ला स. ०७ दरम्यान घराबाजूला झाडांना पाणी देत होते. तेवढ्यात त्यांची नजर चूकवित परीसरातील एका मद्यपीने घरात शिरून समोर चार्जिंगला लागलेला स्मार्टफोन खिशात टाकून निघून गेला. अशोक यांनी चौकातीलच प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ जिल्हा अध्यक्ष आशिष चेडगे यांना सोबत घेऊन सर्व दारू दुकानाच्या परीसरात शोधाशोध केली. जवळील चौकात लोकांनी सांगितले की, त्याच्या खिशात मोबाईल होता व तो “मोबाईल घेता का” म्हणून फिरत होता. व त्याने फोन कुणाला तरी अल्प पैशात दारूसाठी विकला. अशोक व त्यांचा मुलगा प्रविण कोटांगले वय ३० हे त्या मद्यपीच्या घरी गेले. तो अती मद्यप्राशन करून झोपला होता. त्याला विनंती केली तरीसुद्धा कुणाला फोन विकला हे काहीच सांगितले नाही. अखेर प्रविण याने स. ०७:५४ ला थेट ११२ पोलीस हेल्पलाईन वर कॉल केला. तक्रार एका महिला कर्मचारींनी नोंद केली. लोकेशन विचारले व फोन ठेवला. आणि गणेश वार्ड लोकेशन घटनास्थळी ०८:०४ ला साकोली पोलीस ठाणे वाहन दाखल झाले. यात त्या “डायल ११२” ऑनलाईन वर बसलेले पोलीस नायक कैलाश मेंढे व सुनिल सरजारे यांनी त्या मद्यपीच्या थेट घरी जाऊन चौकशी करीत त्यांची पूर्ण दारू उतरीत पर्यंत हे प्रकरण चौकशीत घेतले. सदर मद्यपीने केवळ दारूसाठी मोबाईल अखेर कुणाला विकला याचा सखोल शोध सुरू आहे. या प्रकरणात “देशभक्ती..जनसेवा” हे सुद्धा ब्रिद वाक्य जपणारे महाराष्ट्र पोलीसांनी पोलीस हेल्पलाईन “डायल ११२” चा काय पॉवर असते याची प्रचिती येथे उपस्थित जनतेला करून दाखविली आहे. यावर पोलीस निरीक्षक एम. पी. आचरेकर यांनी साकोलीत जिल्हा पोलीस अधिक्षक नुरूल हसन हे आले असता त्यांनी आपल्या भाषणात सांगितलेच होते की, साकोली पोलीस सदैव जनतेच्या सेवेसाठी तत्पर आहेत. हीच प्रचिती आज मुख्य शहर गणेश वार्डात बघायला मिळाली ही गौरवशाली बाब म्हणावी लागेल.



