
संजीव भांबोरे महाराष्ट्र प्रतिनिधी
भंडारा –पवनी तालुक्यातीलअड्याळ येथील तान्हा पोळा निमित्ताने होळी चौक येथेतोरण तोडण्याचा चित्त थरारक पर्वाचा आयोजन करण्यात आले होते. या निमित्ताने गावातील समस्त चिमुकले मंडळी आपली नंदी सजवून आणि रंगीबेरंगी वेशभूषा परिधान करून आली होती. यावेळी गावातील ग्रामपंचायत तथा पोलिस प्रशासन अधिकारी कर्मचारी, सरपंच उपसरपंच, सदस्य, तसेच ग्रामस्थांसह प्रतिष्ठित मंडळी उपस्थित होते. तोरण तोडण्याचा कार्यक्रम दोन तासांत पार पडला, याचा समस्त -ग्रामस्थानी आनंद घेतला.



