Friday, January 16, 2026

National

spot_img

वनाधिकाऱ्यांना थार, स्कार्पिओ वाहने देणारा महाराष्ट्राचा वन विभाग देशात पहिला ठरणार,

सचिन ढोके अमरावती जिल्हा प्रतिनिधी

: भंगार व कालबाह्य झालेल्या वाहनांच्या आधारावर वनसंरक्षणाची जबाबदारी पेलणाऱ्या वनाधिकाऱ्यांना आता अत्याधुनिक वाहने उपलब्ध होणार आहेत. राज्य शासनाने थार, स्कार्पिओसारखी ड्राइव्ह वाहने खरेदीस मंजुरी दिली आहे. ५६३ वाहने वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांसाठी खरेदी केली जाणार आहेत. विशेष म्हणजे, थारसारखी अत्याधुनिक वाहने खरेदी करणारा महाराष्ट्राचा वन विभाग देशात पहिला ठरणार आहे.सन २०१५-१६ मध्ये ४०० आरएफओंना टाटा ड्रोनान ही वाहने देण्यात आली होती. मात्र, आज ही सर्व वाहने भंगार अवस्थेत असून, वापरण्यायोग्य राहिलेली नाहीत. त्यामुळे प्रादेशिक आणि वन्यजीव विभागात कार्यरत ५६३ आरएफओ वाहनांअभावी कसेबसे वनसंरक्षण करत होते. दुर्गम भागात कार्यरत असताना ‘रॉइट ऑप’ किंवा जीर्णावस्थेतील वाहनांवर अवलंबून राहणे ही अडचण बनली होती. मात्र, आता राज्य शासनाने १,४४२ नवीन वाहने खरेदी करण्यास मान्यता दिली आहे. महसूल व वन विभागाने शासन निर्णय पत्र क्रमांक ३३१ क-५ दि. २१ ऑगस्ट २०२५ रोजी आदेश निर्गमित करून वाहने खरेदीला मंजुरी प्रदान केली आहे. कोणती वाहने खरेदी करणार?केंद्र सरकारच्या पर्यावरण व वन मंत्रालयाने सन २०२४ मध्ये जारी केलेल्या परिपत्रकाच्या परिच्छेद ४ अंतर्गत राज्यांच्या वन विभागांना अत्याधुनिक वाहने खरेदी करण्याची परवानगी दिली आहे. त्यानुसार महाराष्ट्राच्या वन विभागाला आता बोलेरो, ईटिंगा, सुमो, स्कार्पिओ आणि थार यासारखी वाहने खरेदी करण्याची मुभा मिळाली आहे. वन विभागाला ही अत्याधुनिक वाहने कॅम्पा योजनेच्या निधीतून खरेदी करता येतील. 

International

RELATED ARTICLES