
संजीव भांबोरे महाराष्ट्र प्रतिनिधी
5 सप्टेंबर शिक्षक दिनानिमित्त खासदार निलेश लंके व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते होणार पुरस्कार प्रदानसंजीव भांबोरे महाराष्ट्र प्रतिनिधीपुणे -स्व.पै.किसनराव डोंगरे बहुउद्देशीय संस्था,श्री नवनाथ युवा मंडळ, धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालय व पै.नाना डोंगरे व्यायाम शाळा निमगांव वाघा, ता.जि. अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने,आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा 2025 दि. 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिनानिमित्त निमगाव वाघा येथील परिवार मंगल कार्यालयात संपन्न होणार असून आपल्या कार्याची पावती म्हणून हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी राज्यभरातून पुरस्कारार्थी उपस्थित राहणार आहेत.या कार्यक्रमास सोजाई आदिवासी महिला विकास फॉउंडेशन सचिव अँड जयश्री बी सोनवणे यांना देखील राज्यस्तरीय “झाशीची राणी लक्ष्मीबाई ” पुरस्कार जाहीर झाला असून 5 सप्टेंबर शिक्षक दिनानिमित्त खासदार निलेश लंके व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.अँड.जयश्री बी सोनवणे या दैनिक माझा मराठवाडा वृत्तपत्राच्या निवासी संपादिका, रिपब्लिकन आवाज न्यूजच्या उपसंपादिका त्यासोबतच त्या एक सामाजिक कार्यकर्त्या एक कवयित्री एक व्याख्यात्या अशा सर्वगुण संपन्न व्यक्तिमत्व असून अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्याचं काम त्या करत असतात. या सर्व कार्याची दखल घेत त्यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आलं असल्याचं संस्थेचे अध्यक्ष पैलवान नानाभाऊ डोंगरे यांनी निवड पत्राद्वारे कळवले आहे.



