
संजीव भांबोरे महाराष्ट्र प्रातिनिधी
भंडारा-वंचित बहुजन आघाडी तालुका भांबोरेकोली तर्फे हरित क्रांती दिवस व अमित नागदेवे यांचा वाढदिवस वंचित बहुजन आघाडी तर्फे शारदा चौकात वृक्षारोपण करण्यात आले
याप्रसंगी वंचित बहुजन आघाडी जिल्हा महिला अध्यक्ष तनुजा नागदेवे , वंचित बहुजन आघाडीचे माजी जिल्हा संघटक डी जी रंगारी, यादोराव गणवीर, गणेश गजभिये इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत वृक्षारोपणच्या कार्यक्रम संपन्न झाला
झाडे लावा ,झाडे जगवा हा उपक्रम पर्यावरणाचा सध्या ऱ्हास होत चाललेला आहे जंगलचे जंगल नाहीसे करण्यात येत आहेत आणि त्याच्या परिणाम पर्यावरणाला होत आहे पाणीटंचाईची समस्या निर्माण होत आहे त्यामुळे हे सर्व लक्षात घेता पर्यावरण समतोल राखण्याकरिता वृक्ष लागवड करणे व त्याची जोपासना करणे आवश्यक आहे आणि म्हणून एक हरितक्रांती औचित्य साधून विविध जातीचे झाड लावण्यात आले. जांभूळ ,कदम ,करंजी असे विविध प्रजातीचे झाड लावून वृक्षारोपण करण्यात आले
याप्रसंगी सविता वालदे,गीता वलथरे ,बबीता रामटेके काहीतरी वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते व महिला कार्यकर्ते याप्रसंगी उपस्थित होते.



