

सचिन ढोके अमरावती जिल्हा प्रतिनिधी
अमरावती : हॉकीचे खेळाडू मेजर ध्यानंचद यांचा जन्मदिन दि. 29 ऑगस्ट राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा करण्यात येत आहे. यानिमित्ताने मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या 300व्या जयंतीनिमित्त क्रीडा व खेळाचा प्रचार व प्रसार व्हावा, तसेच शहरी व ग्रामीण भागातील नागरीकांपर्यंत क्रीडा व खेळाचे महत्व पोहोचविणे, निरोगी राहण्याचा संदेश, युवक युवतीमध्ये क्रीडा विषयक वातावरण निर्माण व्हावे, क्रीडा संस्कृतीचे संवर्धन व जतन व्हावे. यासाठी विविध उपक्रम क्रीडा दिनाच्या निमित्याने आयोजित करण्यात येत आहे. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे क्रीडा स्पर्धा उपक्रमाअंतर्गत दि. 29 ऑगस्ट रोजी सकाळी 7 वाजता मॅरेथॉन स्पर्धाचे आयोजन करण्यात येणार आहे. ही मॅरेथॉन जिल्हा क्रीडा संकुल येथून निघून बियाणी चौक, जिल्हाधिकारी कार्यालय, हायस्कुल चौक. गव्हर्नमेंट गर्ल्स हायस्कुल चौक येथून परत गव्हर्नमेंट गर्ल्स हायस्कुल चौक, जिल्हाधिकारी कार्यालय, बियाणी चौक, जिल्हा क्रीडा संकुल येथे मॅरेथॉनचा समारोप होईल. मॅरेथॉन स्पर्धा या खुला गट पुरुष व महिला स्वतंत्रप्रमाणे दोन प्रकारात होतील. पुरुष व महिला गटात प्रथम क्रमांक प्राप्त करणाऱ्या खेळाडुस 3 हजार, व्दितीय 2 हजार, तृतिय 1 हजार रोख पारितोषिक, तसेच सर्व सहभागींना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी होण्यासाठी क्रीडा अधिकारी त्रिवेणी बाते मो.नं. 9975590232 यांच्याशी संपर्क साधावा, तसेच खेळाडुंनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांनी केले आहे.



