
सचिन ढोके अमरावती जिल्हा प्रतिनिधी
अमरावती: चांदूरबाजार ब्राह्मणवाडा थडी ते शिरजगाव रोड परिसरात सुरू असलेल्या अवैध वृक्षतोडीविरोधात कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी वृक्षप्रेमी गौतम खंडारे यांनी तहसील कार्यालयासमोर २७ ऑगस्टपासून आमरण उपोषणास प्रारंभ केला आहे. खंडारे यांनी सांगितले की, ०४ ऑक्टोबर २०२४ रोजी या अवैध वृक्षतोडीबाबत परतवाडा वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांकडे (RFO) तक्रार केली होती. त्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला (PWD) कळवून दोषींवर एफ.आय.आर दाखल करण्याचे निर्देश दिले होते. मात्र उपविभागीय अभियंता मिलिंद भेंडे यांनी शासकीय कर्तव्याकडे दुर्लक्ष करून कोणतीही कारवाई न करता आरोपींची उघडपणे पाठराखण केली, असा गंभीर आरोप खंडारे यांनी केला आहे. वारंवार पाठपुरावा करूनही न्याय न मिळाल्याने अखेर त्यांनी आमरण उपोषणाचा मार्ग अवलंबला. त्यांच्या प्रमुख मागण्या अशा आहेत :1️⃣ ब्राह्मणवाडा थडी ते शिरजगाव रोडवरील अवैध वृक्षतोडीबाबत नवीन एफ.आय.आर दाखल करणे.2️⃣ आरोपींची पाठराखण करणारे उपविभागीय अभियंता मिलिंद भेंडे यांच्यावर तातडीने कायदेशीर कारवाई करणे.दरम्यान, या उपोषणाला वंचित बहुजन आघाडीने जाहीर पाठिंबा दिला आहे. आज आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदारांना निवेदन देऊन शासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली.निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र शासन एकीकडे वृक्षलागवड मोहिमा राबवून पर्यावरण संवर्धनाचे प्रयत्न करीत असताना, दुसरीकडे काही भ्रष्ट अधिकारी अवैध वृक्षतोड करणाऱ्यांना पाठीशी घालत आहेत. ही बाब संतापजनक असून शासनाच्या दुहेरी भूमिकेमुळे ग्रामस्थांमध्ये अविश्वास वाढत आहे.आघाडीने पुढील ठोस मागण्या केल्या आहेत –१) तालुक्यातील अवैध वृक्षतोड तातडीने थांबवावी.२) वृक्षतोड करणारे आरोपी व त्यांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी.३) पर्यावरण रक्षणासाठी प्रशासकीय व कायदेशीर पातळीवर सक्त उपाययोजना कराव्यात.”शासनाने तातडीने कारवाई केली नाही तर वंचित बहुजन आघाडी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन उभारेल,” असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.निवेदन देताना तालुका अध्यक्ष सुरज चव्हाण, उपाध्यक्ष आकाश उके, तालुका महासाचिव तोषल नवले, तालुका संघटक आकाश वानखडे, उपाध्यक्ष हरिदास इंगळे, तसेच भारत तायडे, पवन मनोहरे, शेख अक्रम व राजकुमार खंडारे आदी पदाधिकारी उपस्थित होते.✊ “पर्यावरण वाचवा – भ्रष्टाचार थांबवा” ✊ या घोषणांनी तहसील कार्यालय परिसर दुमदुमून गेला.



