
संजीव भांबोरे महाराष्ट्र प्रतिनिधी
भंडारा : दक्षिणात्य हिंदू संस्कृतीची आराध्य दैवत माता रेणूकाआई यांच्या पुज्यनीय स्थानातील गौड्स कलार समाज भंडारा जिल्हा वतीने साकोली शहरात ( शुक्र. २९ ऑगस्ट ) ला “सरदार सरवाई पापन्ना गौड” यांची ३७५ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. प्रसंगी समाजातील सर्व पदाधिकारी हजर झाले होते. दक्षिणात्य “गौड्स कलार समाज” वतीने शहरातील उत्तमराव गोडशेलवार यांच्या निवासस्थानी “सरदार सरवाई पापन्ना गौड” यांची जयंती साजरी केली. यावेळी महिला पदाधिकाऱ्यांनी आराध्य दैवत माता रेणुकाआई व सरदार सरवाई पापन्ना गौड यांच्या प्रतिमेचे विधीवत पूजा अर्चना करीत महाआरती संपन्न झाली. भंडारा जिल्हा गौड्स कलार समाज पदाधिकारींनी सरदार सरवाई पापन्ना गौड यांच्या धार्मिक विधी जीवनावर प्रकाश टाकला आणि मार्गदर्शन केले. प्रसंगी महिला भगिनींनी संगीतमय कार्यक्रम आयोजित केला होता. जयंतीनिमित्त कार्यक्रमास भंडारा जिल्हा अध्यक्ष नारायण गोप्पागोणिवार, जिल्हा परिषद महिला बालकल्याण सभापती अनिता नालगोपुवार, उपाध्यक्ष उत्तम गोडशेलवार, सचिव कैलास गोडशेलवार, गौड्स कलार समाज उद्यमम अध्यक्ष रमेश नलगोपुलवार हे प्रामुख्याने उपस्थित होते. जयंतीनिमित्त धार्मिक विधी नंतर महाप्रसाद वितरण करण्यात आले. या ३७५ जयंतीनिमित्त गौड्स कलार समाज भंडारा जिल्हा व साकोली तालुका शाखेचे पांडुरंग निलफुलवार, परशुराम गोडशेलवार, ईश्वर बोरघमवार, श्रीनिवास गणगोणिवार, महेश गणगोणिवार, राजू गोडशेलवार, जीवन गोडशेलवार, चंद्रम तुराई, व्यंकट उत्तमवार, मारोती कद्रेवार, मनोज गोडशेलवार, विजय गोडशेलवार तथा समस्त महिला पुरुष पदाधिकारी व सदस्यगणांनी अथक परिश्रम घेतले.



