
संजीव भांबोरे महाराष्ट्र प्रतिनिधी
भंडारा -साकोली तालुक्यातील उमरी येथे तनुजा गीत गायन भंडाराबहुउद्देशीय संस्थेमार्फत उमरी येथे हरित क्रांती दिवसानिमित्त उमरी ते परसोडी रोडवर वृक्षारोपण करण्यात आले वेगळ्या विविध झाडांचा लागवड करण्यात आली झाड मोठ करणे त्यांच्या संगोपण करणे ,पाणी देणे या सर्व बाबीकडे लक्ष देण्यात येईल आज झाड लावणे वृक्षारोपण करणे अत्यंत आवश्यक झाले आहे पर्यावरण टिकवणे व वृक्षांची जोपासना करणे हे आवश्यक झाले आहे कारण आपल्याला झाडे फळे फुले देतात आपल्या त्यांच्यापासून ऑक्सिजन मिळतो उन्हाळ्याच्या दिवशी सावली मिळते वरून मेल्यानंतर सुद्धा जा जाळण्याकरता लाकडे सुद्धा मिळतात अत्यंत हे आवश्यक बाब झाली असून झाडे लावा झाडे जगवा असा संदेश वृक्षारोपण करून तनुजा गीत गायन बहुउद्देशीय संस्था साकोली या संस्थेमार्फत आव्हान करण्यात आले याप्रसंगी तनुजा गीत बहुद्देशीय संस्थेचे अध्यक्ष तनुजा नागदेवे , संस्थेचे उपाध्यक्ष डी जी रंगारी, संस्थेचे सचिव अमित नागदेवे, सुरज नागदेवे, मनोज मडामे ,गौतम मडामे, प्रियंका गडपायले ,विना मेश्राम व इतरही पदाधिकारी उपस्थित होते याप्रसंगी इतरही सामाजिक कार्यकर्ते महिलावर्ग या प्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



