Thursday, January 15, 2026

National

spot_img

क्षितिज जांभुळकर यांनी घातली मुख्याधिकारी पदाला गवसणी,

संजीव भांबोरे महाराष्ट्र प्रतिनिधी

भंडारा-माणसाने ध्येयाचा अंतिम टप्पा गाठल्यानंतर इतका आनंद होतो की आभाळ दोन हात राहिल्यासारखा भास होतो अशीच घटना जांभूळकर परिवारात घडली . क्षितिज ममता ग्यानचंद जांभुळकर खोकरला जिल्हा भंडारा यांनी 2023 मध्ये संपन्न झालेल्या एमपीएससीच्या परीक्षेत यश गाठले व मुख्याधिकारी या पदाला त्यांनी गवसणी घातली. क्षितिज जांभूळकर यांनी आपले प्राथमिक शिक्षण मराठी माध्यमातून पूर्ण केले आहे. माध्यमिक शालेय जीवनापासून त्यांच्या मनामध्ये जिद्द होती की मी मोठा अधिकारी होणारच ती त्यांची जिद्द वर्धा या ठिकाणी मुख्याधिकारी या पदावर नियुक्तीमुळे पूर्ण झालेली आहे . त्यांचे शिक्षण बीएससी गणित मध्ये झालेले आहे.त्यांनी आत्तापर्यंत सहा स्पर्धा परीक्षा पूर्णपणे पास केलेले आहे. सहापैकी ब गटाची मुख्याधिकारी ही नोकरी त्यांनी स्वीकारलेली .आहे मनामध्ये जिद्द असेल तर ह्या जगामध्ये काहीही अशक्य नाही हे क्षितिज यांनी दाखवून दिलेले आहे. सध्या त्या जिल्हा परिषद भंडारा येथे शिक्षण विभाग या ठिकाणी जुनियर असिस्टंट म्हणून कार्यरत होत्या. क्षितिज सेवानिवृत्त जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षक ग्यानचंद ताराचंद जांभूळकर यांच्या कन्या असून ग्यानचंद जांभूळकर हे विविध सामाजिक संघटनांशी जोडलेले असून जशी त्यांनी विद्यार्थ्यांची काळजी घेतलेली आहे तसेच त्यांनी आपल्या मुलांकडे पण दुर्लक्ष केलेले नाही त्यामुळे समाजातील नव युवकांनी यापासून प्रेरणा घ्यावी व आपले ध्येय गाठावे क्षितिज यांच्या निवडीबद्दल विविध सामाजिक संघटनांनी व त्यांच्या मित्रांनी अभिनंदन केलेले आहे

International

RELATED ARTICLES