
संजीव भांबोरे महाराष्ट्र प्रतिनिधी
नाशिक – येथील पंचवटी ललित कला मंडळ आयोजित उत्कृष्ट काव्यवाचन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती या कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ कविवर्य उगलमुमले प्रमुख पाहुणे म्हणून रवींद्र मालुंजकर नाशिक कवी संस्थेचे कवी सुभाष सबनीस साहित्यकणा फाउंडेशनचे सचिव विलास पंचभाई पलकम चे अध्यक्ष कवी अरुण इंगळे सूत्रसंचालन गझलकार गोरख पालवे प्राचार्य राजेश्वर शेळके पवार कार्यक्रमाचे प्रास्ताविक पंकज कुमार गवळी यांनी केले कवी संमेलनाचे अध्यक्ष उगलमुगले यांनी म्हणाले कविता ही माणसं जोडणारी चळवळ आहे स्पर्धा म्हणजे कवितेचे मोजमाप नाहीसाहित्याच्या अंगणातील सर्वात सुंदर फुल म्हणजे कविता आहेकवींनी खूप वाचलं पाहिजे ऐकलं पाहिजे आणि मग लिहिलं पाहिजे त्यावर चिंतनही केलं पाहिजेकविता सादरीकरण एक कला आहे ती सुद्धा पारंगत आली पाहिजे पारंगत झाली पाहिजे असे प्रतिपादन अध्यक्ष उगलमुगल हे भाषणात ते व्यक्त झाले उत्कृष्ट काव्यवाचनात प्रथम सर्वेश कांबळे निशांत गुरु यांना विभागून बक्षीस देण्यात आले तसेच द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक सोनाली चव्हाण आणि नितीन गाढवे यांना देण्यात आले तृतीय भावेश जाधव व माधुरी अमृतकर यांना विभागून पारितोषिक देण्यात आले बालकवी प्राची पवार हिला उत्तेजनार्थ बक्षीस सन्मान चिन्ह सन्मानपत्र देवून सन्मानित करण्यात आले या कार्यक्रमासाठी यशस्वीरित्या कामगिरी करणारे राजेंद्र उगले चेतन बर्वे प्रवीण जाधव समाधान मुर्तडक अनिल सूर्यवंशी रोहित कानडे यांनी परिश्रम घेतले अशाप्रकारे पलकमची उत्कृष्ट काव्यवाचन स्पर्धा नाशिक येथे संपन्न झाली



