
अरुण वाघमारे मुंबई प्रतिनिधी
मराठी अभिनेत्री प्रिया मराठे यांचं वयाच्या 38 व्या वर्षी निधन झाल्याची माहिती समोर आली आहे .गेल्या काही दिवसांपासून त्यांना कॅन्सरने ग्रासलं होतं. प्रिया मराठे यांच्या जाण्याने मराठी सिनेसृष्टीवर शोककळा पसरल्याचं पहायला मिळतंय प्रिया मराठे यांनी फक्त मराठी नाही तर हिंदी मालिकांमध्येसुद्धा काम करून आपली वेगळी ओळख निर्माण केली. ‘कसम से’, ‘पवित्र रिश्ता’, ‘बडे अच्छे लगते हैं’ यांसारख्या लोकप्रिय हिंदी मालिकांमधील त्यांच्या भूमिका प्रेक्षकांच्या लक्षात राहिल्या. मराठीत त्यांनी ‘चार दिवस सासूचे’, ‘तू तिथे मी’ या मालिकांमध्ये काम केले. त्यांनी ‘कॉमेडी सर्कस’ या कार्यक्रमातूनही प्रेक्षकांना खळखळून हसवलं. त्यांच्या सहजसुंदर अभिनयशैलीमुळे त्या प्रेक्षकांच्या मनात घर करून राहिल्या.अभिनयाची छाप उमटवलीप्रिया मराठे यांचा जन्म २३ एप्रिल १९८७ रोजी ठाणे येथे झाला. २००६ मध्ये ‘या सुखांनो या’ या मराठी मालिकेतून त्यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. पहिल्याच भूमिकेतून त्यांनी प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आणि पुढे विविध मालिका व चित्रपटांतून आपल्या अभिनयाची छाप उमटवली.



