Thursday, January 15, 2026

National

spot_img

शासनाच्या महसूल व वन विभाग तहसील कार्यालय पवनी यांच्यामार्फतग्रामपंचायत कार्यालय अड्याळ येथे भटके,विमुक्त दिवस कार्यक्रम संपन्न,

संजीव भांबोरे महाराष्ट्र प्रतिनिधी

भंडारा_ पवनी तालुक्यातील अड्याळ येथील ग्रामपंचायत मध्ये आज दिनांक 31 ऑगस्ट 2025 ला सकाळी 11 वाजता महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग तहसील कार्यालय पवनी यांच्यामार्फत भटके, विमुक्त दिवस या महाराष्ट्र शासनाच्या उपक्रमांतर्गत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते. यावेळी सर्वप्रथम प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत लोकशाहीर आण्णाभाऊ साठे व राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षपदी पवनी येथील तहसीलदार प्रमोद राऊत उपस्थित होते तर प्रमुख अतिथी म्हणून पवनी येथील नायब तहसीलदार सुभद्रा धुर्वे, मंडळ अधिकारी नथुजी शेंडे ,भंडारा जिल्हा मच्छीपार संघाचे अध्यक्ष देविदास नगरे, अड्याळ येथील ग्रामपंचायत अधिकारी कुमारी पौर्णिमा साखरे ,पत्रकार प्रकाश हातेल ,शरद गाढवे तलाठी, सुमित चौकडे तलाठी नेरला, अंकुश पाटील महसूल सहाय्यक, दिनेश मेश्राम सहाय्यक पवनी, प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे, पत्रकार विशाल रणदिवे यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी मच्छीमार संघाचे जिल्हाध्यक्ष देविदास नगरे यांच्या हस्ते उपस्थित मान्यवरांचा शाल ,श्रीफळ ,पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे आरोग्य विषयक बीपी, सुगर, तपासणी शिबिर, जातीचे दाखले ,नॉन क्रिमिलियर ,उत्पन्नाचे दाखले ,रहवासी दाखले ,आधार कार्ड, लाभार्थ्यास लाभ देण्या संबंधाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रम यशस्वी करण्याकरता दमयंती नाहे ,गणेश लांजेवार, दिनेश ढवळे ,रामभाऊ मांढरे, अशोक मांढरे ,व सर्व विमुक्त भटक्या /जाती,जमातीचे, एनटी ढीवर, कहार, भोई ,धनगर, बंजारा ,बेलदार, गाडी लोहार ,गोंधळी, वडार, सरोदे ,सोनझरी भाट, नंदीवाले, गोसावी, पारधी, समाजातील महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.

International

RELATED ARTICLES