
संजीव भांबोरे महाराष्ट्र प्रतिनिधी
गोंदिया–जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यात येत असलेल्या केशोरी पोलीस स्टेशन अंतर्गत जनावरांची कत्तल करून गोमांस विक्री करत असल्याच्या गोपनीय माहितीच्या आधारावरून केशोरी पोलिसांनी विना-विलंब न करता सापळा रचून जनावरांची बेकायदेशीरपणे मास विक्री करणाऱ्यांस रंगेहात पकडले आहे.ही कारवाई २६ ऑगस्टला केशोरी/कनेरी येथे करण्यात आली असून,एकूण १५ किलो इतका मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.या कारवाईत केशोरी पोलिसांनी आरोपी मेहबूब अजित पठाण(वय वर्ष 40) व रोशन निमकर(वय वर्ष 26)रा.कनेरी/केशोरी यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.केलेली कारवाई पोलीस अधीक्षक गोरख भामरे व ठाणेदार मंगेश काळे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली असून,ह्या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शुभम नवले हे करीत आहेत.



