

संजीव भांबोरे महाराष्ट्र प्रतिनिधी
भंडारा– आज दिनांक 31 ऑगस्ट 2025 ला रामटेक येथील निवासस्थानी मदत व पुनर्वसन मंत्री आशिष जयस्वाल यांची भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीच्या वतीने भेट घेऊन मागण्यांचे निवेदन देण्यात आले. त्यावेळी मंत्री आशिष जयस्वाल यांनी प्रकल्पग्रस्तांना सांगितले की ,पुढील सप्टेंबर महिन्यात 17 ते 20 तारखेच्या आत मुंबई मंत्रालयात तुमची बैठक लावणार असल्याचे यावेळी शिष्टमंडळाला सांगितले. देण्यात आलेल्या प्रमुख मागण्यांमध्ये नव्याने 22 गावाचे पुनर्वसन 2013 च्या कायद्यानुसार किंवा पुनर्वसन करण्यात यावे , आपसी भांडणातले प्लॉट वाटप करण्यात यावे ,पूरग्रस्त पुनर्वसन नव्याने २२ गावांना मान्य नाही, आपसी भांडणात रखडलेले पैसे प्रत्येकाच्या नावे करून देण्यात यावे ,गावठाणा बाहेरील असलेल्या घरातील सदस्यांना प्रकल्पग्रस्ताचे दाखले देण्यात यावे, बऱ्याच गावात 18 नागरिक सुविधा पूर्ण झाल्या नाही ते काम तात्काळ पूर्ण करण्यात यावे ,बरेचसे जिल्हा परिषदला हस्तांतरित केले आहेत त्या गावच्या समस्या तात्काळ सोडविण्यात याव्यात, बँक वॉटर खाली येणारी जमीन बऱ्याच गावची सुटलेली आहे त्यांचे सर्वे करून हस्तांतरित करण्यात यावे, रोजगार निर्मितीसाठी गोसेखुर्द प्रकल्पावर आधारित असलेल्या उद्योगात प्रकल्पग्रस्तांना प्राधान्य देण्यात यावे, अशोक नगर तालुका भंडारा येथील गट क्रमांक 95 /2 क्षेत्र 0.7 हेक्टर आर क्षेत्र च्या प्रस्ताव भाडेपट्टी स्वरूपात प्रस्तावित करण्याऐवजी एम एल आर सी सेक्शन 22 अंतर्गत प्रस्तावित करावा , अंशतः बाधितांना आर्थिक पॅकेज देण्यात यावे ,नव्याने 22 गावाचे झालेले सर्वे चुकीची असल्यामुळे पूर्ण घराचे व जमिनीचे सर्वे करण्यात यावे ,निवेदन देताना भंडारा जिल्हा प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीचे अशासकीय सदस्य भाऊ कातोरे ,अतुल राघोरते उपाध्यक्ष, मनीषा भांडारकर,प्रमिला शहारे उपाध्यक्ष, रोशन भंडारकर , सैग कोहपरे , अमृत साखरवाडे ,संजय मते, राजेश आजबले, आशिष कांबळे विलास भोयर,यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.



