

संजीव भांबोरे महाराष्ट्र प्रतिनिधी
भंडारा–एस टी कर्मचारी गणेशोत्सव साकोली आगार तर्फे रक्तदान शिबिर व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.रक्तदान शिबिराचे उदघाटन डॉ.चंदवानी साहेब, डॉ.अतुल दोनोडे, सचिन आगरकर आगार प्रमुख साकोली डॉ.हेमकृष्ण कापगते माजी आमदार ,विजय नंदागवळी माजी साहाय्यक वाहतूक निरीक्षक भंडारा , शेंडे साहेब आगार प्रमुख हिंगणघाट,डॉ आशिष चिंदालोरे भावेश कोटांगले ग्रा. प सदस्य तथा सामाजिक कार्यकर्ते व सर्व एस टी कर्मचारी यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.आरोग्य शिबीर मध्ये, नेत्र तपासणी, थायरॉईड ,सिकलसेल,अस्तिरोग,ईसीजी,शुगर,बीपी,दंत तपासणी,लघवीचे विकार,कॅन्सर तपासणी चेआयोजन व रक्तदान शिबिर आयोजन करण्यात आले होते. सर्व प्रथम विजय नंदागवळी माजी सहायक वाहतूक निरीक्षक यांनी 59 व्या वर्षी सुद्धा प्रथम रक्तदान केले.विविध प्रवाशी यांनी आरोग्य तपासणी केली व रक्तदान सुद्धा केलेवैद्यकीय चमू डॉ दीपक चंदवानी,, डॉ लता भगत,कु भाग्यश्री बन्सोड,अभिषेक धांडे,पियुष नेवारे रक्तपेढी तंत्रज्ञ, पल्लवी जांभुळकर, सचिन खंडाईत, डॉ मीरा सोनवाणे रक्त संक्रमण अधिकारी, मेघा पेंदाम,कल्पना येवले,रेशम हाडगे,हनुमंत गुट्टे,विशाखा सोनवाणे यांनी सेवा दिली या कार्यक्रमाचे संयोजक मनोजभाऊ राखडे संस्थापक रक्तविर संघटना विदर्भ सेवा तुमसरकार्यक्रम यशस्विते साठी राज्य परिवहन कर्मचारी साकोली यांनी सहकार्य केले.



