
सचिन ढोके अमरावती जिल्हा प्रतिनिधी
अमरावती : दहा दिवसांच्या गणेशोत्सवात करतात. बऱ्याच भागात लाकडी गौरी असतात. मुखवटेही असतात. दरवर्षी त्यांना साडी नेसवून अगदी देवाप्रमाणे नटवतात. महिला आपल्या गौरीचा साजशृंगार प्रेमाने करतात.गणपती महाराजांची आई गौरी यांचीही विशेष पूजा केली जाते. महाराष्ट्र तसेच इतर राज्यांमध्ये गणेश चतुर्थी उत्सवादरम्यान अनेक घरांमध्ये ज्येष्ठा गौरी पूजन केले जाते. यंदा २०२५ मध्ये ३१ ऑगस्ट रोजी गौरी आवाहन, तर १ सप्टेंबर रोजी गौरी पूजन आणि २ सप्टेंबर रोजी गौरी विसर्जन आहे. दुसरा दिवस गौरी किंवा महालक्ष्मी पूजनाचा असतो. दुसऱ्या दिवशी म्हणजेच १ सप्टेंबर रोजी ज्येष्ठा नक्षत्रावर गौरींची पूजाकेली जाणार आहे. या पूजेत सकाळी गौरीची पूजा-आरती करून केलेल्या फराळाचा (रव्याचा लाडू, बेसनलाडू, करंजी, चकली, शेव, गुळपापडीचा लाडू) नैवेद्य दाखवला जातो. कुणाकडे संध्याकाळच्या मुहूर्तावर महालक्ष्मीची पूजा केली जाते. भाद्रपद शुद्ध सप्तमीला अनुराधा नक्षत्रात गौरी आवाहन केले जाते. ती एकटी येत नाही तर त्या दोघी बहिणी येतात, म्हणून त्यांना ज्येष्ठा आणि कनिष्ठा गौरी म्हणतात. गौरी ही गणपतीची आई म्हणजे पार्वती माता आणि माता लक्ष्मीची थोरली बहीण मानली जाते. प्रत्येक घरात आपापल्या चालीरिती, कुळधर्म-कुळाचार यांचे पालन करून गौरी आवाहन, पूजन आणि विसर्जन केले जाते. काही घरांत गणपती बसत नाही,नैवेद्यात १६ पक्वान्नाचे महत्वगौरी पूजन म्हणजे गौराईला पाहुणचार हा नैवेद्य पुरणपोळी, ज्वारीच्या पिठाची आंबील, अंबाडीची भाजी, सोळा भाज्यांची एकत्र भाजी, दिवेफळ, शेंगदाणा आणि डाळीची चटणी, पंचामृत, पडवळ घालून केलेली ताकाची कढी, कटाची आमटी, वेगवेगळ्या प्रकारची भजी, पापड, लोणचे इत्यादी पदार्थ केळीच्या पानावर रितसर वाढली जातात. नैवेद्याला १६ भाज्या, १६ कोशिंबिरी, १६ चटण्या, १६ पक्वाने तसेच फराळाचे पदार्थ करतात. पुरणाची १६ दिव्यांनी आरती करतात. संध्याकळी हळदी-कुंकवाचा समारंभ केला जातो. अनेक ठिकाणी रात्री झिम्मा फुगड्या, घागरी फुंके असे खेळ खेळून जागरण केले जाते.पण गौरी बसतात.माहेरवाशीण म्हटल्या जाणाऱ्या गौरींचा मनोभावे पाहुणचार केला जातो. काही ठिकाणी गौरीला महालक्ष्मीही म्हणतात. गौरी आगमनाच्या दिवशी महालक्ष्मीची स्थापना



