



संजीव भांबोरे महाराष्ट्र प्रतिनिधी
भंडारा -भंडारा तालुक्यातील पहेला येथून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या चिखलपहेला रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था असून रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता अशा प्रकारची या रस्त्याची दयनीय अवस्था आहे. मागील दोन वर्षापासून मीडियाच्या माध्यमातून त्याचप्रमाणे स्थानिक जनतेकडून, ग्रामपंचायत कडून,मागणी करण्यात येत आहे परंतु जनप्रतिनिधी ,जिल्हा प्रशासन, यांचे या रस्त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे. या रस्त्याने साधी टू व्हीलर चालवता येत नाही .ठीकठिकाणी खड्डे पडले असून खड्ड्यात पाणी साचलेले आहे रात्रीच्या वेळेस आपलं टू व्हीलर वाहन किंवा फोर व्हीलर वाहन कसे चालवायचे हा सुद्धा जनतेला प्रश्न पडलेला आहे . सरकार शहर स्मार्ट झाले पाहिजे याकरिता प्रयत्न करीत आहे परंतु गाव खेड्यातील रस्ते ज्या रस्त्याने ग्रामीण भागात राहणारा शेतकरी जो अन्नधान्याचे उत्पादन करतो त्यांना जाण्याकरिता व्यवस्थित रस्ते नाही. त्यामुळे शासनाने शहर स्मार्ट बनविण्यापेक्षा खेडे स्मार्ट बनवावे, कारण खनिज संपत्ती खेड्यात आहे.त्यामुळे संबंधित विभागाने या रस्त्याकडे तात्काळ लक्ष केंद्रित रस्त्याचे डांबरीकरण करण्यात यावे अशी मागणी करण्यात येत आहे.



