सचिन ढोके अमरावती जिल्हा प्रतिनिधी
अमरावती : एखाद्या विम्याची दरमहा किंवा वार्षिक हप्ते जरी आपण अल्प किमतीत भरत असलो तरी त्याचा लाभ कितीच्या पटीत व कोणत्या कठीण प्रसंगी मिळेल हे सांगता येत नाही. रेवसा मधील रहिवासी शालिनी संदीप राऊत यांचा अपघातात निधन झाले. पत्नीच्या अचानक जाण्याने त्यांचे पती संदीप राऊत व कुटूंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. पण त्यांच्या पत्नीने काही काळापूर्वी भारतीय स्टेट बँकेच्या वलगाव शाखेतूनप्रधानमंत्री जीवन ज्योती योजनेअंतर्गत केवळ ४३६ रुपयांचा विमा हप्ता भरलेला होता, हे बाबतीत कुटुंबीयांना कोणतीच माहिती नव्हती.या संदर्भात रेवसा येथील ग्राहक सेवा केंद्र संचालक अजिंक्य काळे यांनी पुढाकार घेत राऊत कुटुंबीयांशी व वलगाव शाखा प्रबंधक प्रमोद साठे सर व उपशाखा प्रबंधक मोनली कापसे मॅडम यांच्याशी संपर्क साधला. आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून त्यांनी हा दावा वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवला. या सततच्या पाठपुराव्यामुळे काही दिवसांतच वारस संदीप मधुकर राऊत यांना दोन लाख रुपयांचा धनादेश भारतीय स्टेट बँकेच्या बतीने सुपूर्त करण्यात आला. याप्रसंगी बँकेचे शाखा प्रबंधक प्रमोद साठे , उपप्रबंधक मोनाली कापसे तसेच कर्मचारी व रेवसा येथील सी. एस.पी. संचालक अजिंक्य काळे व राऊत कुटुंब उपस्थित होते.



