Wednesday, January 14, 2026

National

spot_img

महिला स्वयंसिध्दी व्याज परतावा योजना,

सचिन ढोके अमरावती जिल्हा प्रतिनिधी

वर्धा : इतर मागास प्रवर्गातील गरीब, होतकरू, परितक्त्या महिलांचे सक्षमिकरण करुन त्यांना स्वावलंबी व आत्मनिर्भर करण्यासाठी ही योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत महिलांना विविध प्रकारच्या उद्योगांसाठी 10 लाखापर्यंत कर्ज उपलब्ध करून दिले जाते. या कर्जावर 12 टक्के दराने व्याज परतावा दिला जातो.ही योजना महिला आर्थिक विकास महामंडळाच्या लोकसंचालित साधन केंद्राच्या सहाय्याने राबविण्यात येते. पात्र महिला बचत गटातील इतर मागासप्रवर्गाच्या महिला अर्जदारांना सदर व्याज परतावा योजनेचा लाभ ओबीसी महामंडळाकडून दिला जातो. तसेच बचत गटातील उर्वरित महिलांना महिला आर्थिक विकास महामंडळाकडून इतर शासकीय विभाग, महामंडळाच्या योजनेंतर्गत लाभ देण्यासाठी प्रस्तावित केले जाते.महिला बचत गटातील इतर मागास प्रवर्गातील महिलांच्या उत्पादन, प्रक्रिया, मूल्य आधारित उद्योगांकरीता बँकांमार्फत कर्ज मंजूर केले जाते. या कर्जावर महाडमंडळाच्यावतीने व्याज परतावा दिला जातो. इतर मागास प्रवर्गातील किमान 50 टक्के महिलांचा समावेश असलेल्या गटास प्रथम टप्यात 5 लाखापर्यंत कर्ज बँकेकडून उपलब्ध करुन दिले जाते. प्रथम टप्प्यातील कर्ज नियमित परतफेडीनंतर सदर बचतगट द्वितीय टप्प्यात 10 लाखापर्यंत कर्ज मिळविण्यास पात्र ठरतात. नियमित कर्ज परतफेड केलेल्या बचत गटास 12 टक्के पर्यंतच्या व्याज मर्यादेत व्याज परतावा दिला जातो.व्याज परतावा योजनेचा लाभ घेण्यासाठी बचत गटातील महिला इतर मागास प्रवर्गातील व महाराष्ट्राची रहिवासी असावी. वय 18 ते 60 वर्षे दरम्यानचे असावे. महामंडळाच्या योजनेंतर्गत कुक्कुट पालन, दुग्ध व्यवसाय, मत्स्य व्यवसाय, कृषी क्लिनिक, ॲल्युमिनियम फॅब्रिक शॉप, ऑटो स्पेअर पार्टस्, पुस्तकांचे दुकान, फळे व भाजीपाला विक्री दुकान, जनरल स्टोअर्स, हार्डवेअर व पेन्ट शॉप, लाकडी वस्तू बनविणे, विटभट्टी, टेलरिंग युनिट, वास्तू विशारद व्यवसाय, ग्लास व फोटोफ्रेम सेंटर, कापड दुकान, दवाखाना, अभियांत्रिकी सल्ला केंद्र, हॉटेल व्यवसाय, औषध दुकान या व्यतिरिक्त इतर कोणताही कायदेशीर व्यवसाय करता येऊ शकतो.अर्जदाराने स्वतःच्या जात प्रमाणपत्रातील नमुद जातीनुसार मुख्य कंपनी तसेच उपकंपनी यापैकी लागू होणाऱ्या महामंडळ अंतर्गतच्या ऑनलाईन योजनांचा लाभ घेण्याकरीता URL//:www.msobc.org या संकेतस्थळावर जाऊन आवश्यक योजना निवडून अर्ज करणे आवश्यक आहे.

International

RELATED ARTICLES