

सचिन ढोके अमरावती जिल्हा प्रतिनिधी
वर्धा : वर्धा शहरात विविध ठिकाणी विविध प्रकारचे विकास कामे केली जाणार आहे. त्याकामांच्या प्रस्तावित जागांची पाहणी आज पालकमंत्री डॅा.पंकज भोयर यांनी प्रत्यक्ष भेट देऊन केली. ही पायाभूत विकासाठी कामे महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळामार्फत करण्यात येणार आहे.यावेळी त्यांच्यासोबत जिल्हाधिकारी वान्मथी सी., महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ मुंबईचे व्यवस्थापकीय संचालक ब्रजेश दिक्षित, उपविभागीय अधिकारी दिपक कारंडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता महेश मोकलकर, तहसिलदार संदीप पुंडेकर आदी उपस्थित होते.राज्य शासनाच्यावतीने सर्वसामान्य नागरिकांच्या कल्याणासाठी विविध योजना राबविण्यात येत असून या योजनांसोबतच पायाभूत सुविधा निर्माण करुन देण्यात येणार आहे. वर्धा शहरात पायाभूत सुविधा महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ मुबंई यांच्या मार्फत करण्यात येणार आहे. निर्माण करण्यात येणाऱ्या पायाभूत सुविधेचे आराखडे तयार करण्यासाठी आज विविध प्रकल्पाच्या जागेची पाहणी आज पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी केली.यावेळी जिल्हा क्रिडा संकुल येथील सिंथेटीक ट्रॅकच्या बाहेरील बाजुला अत्याधुनिक सुविधा निर्माण करणे, बजाज चौक येथील भाजी बाजार जागेवर भाजी विक्रेत्यांसाठी संकुल उभारणी करणे, जिल्हा कारागृहाची दुरुस्ती व नुतनीकरण, एमआयडीसी येथे शहरातील व लगतच्या गावातील नगरपालिकेच्या पथ दिव्यांचे विज देयक शून्यावर आणण्यासाठी 5 मेगावॅटचा सोलर प्रकल्प व सोलर प्रकल्पाखालील जागेवर सायन्स पार्कचा प्रकल्प सुरु करण्यात येणार असून त्या कामाच्या जागेची पाहणी करण्यात आली.सदर कामाचे आराखडे तयार करण्यासाठी महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांना सूचना देण्यात आल्या. या प्रकल्पामुळे जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळणार असल्याचे पालकमंत्री भोयर यांनी सांगितले.



