

दिपक कटकोजवार चंद्रपूर जिल्हा
प्रतिनिधीचंद्रपूर –शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने दरवर्षी प्रमाणे आज अनंत चतुर्दशीच्या पावन पर्वावर चंद्रपूर शहरातील गणेश विसर्जन शोभायात्रेतील गणेश मंडळांच्या अध्यक्षांचे हार व मोमेन्टो देवुन सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला. स्थानिक धनराज प्लाजा समोर उभारण्यात आलेल्या कांग्रेस च्या भव्य स्वागत मंडपात शहर जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष रितेश रामुभय्या तिवारी यांचें हस्ते प्रत्येक मंडळ अध्यक्षांचे स्वागत करण्यात येत होते. यावेळी मंचावर जिल्हा काँग्रेस चे माजी अध्यक्ष विनायक बांगडे, महिला कांग्रेस जिल्हाध्यक्षा सुनंदाताई धोबे, विनोद दत्तात्रय ज्येष्ठ नेते, सेवादल शिफाई रेखाताई वैरागडे, माजी नगरसेविका सुनिताताई अग्रवाल, पप्पु सिध्दीकी, कुनाल चहारे, पिंटू शिरवार, नौशाद शेख,प्रा. नरेंद्र बोबडे, मोनु रामटेके, शिरीष गोगूलवार, प्रा.अतुल पिंपळकर, काशिफ अली दीपक कटकोजवार, पीतांबर कश्यप, निलेश ठाकरे , यांचेसह प्रमुख कांग्रेस कार्यकर्त्यांची मंचावर उपस्थिती होती.



