Wednesday, January 14, 2026

National

spot_img

संघर्ष

मित्रानो परिस्थिती कशीही असो
परिस्थितीस त्या झगडायला हवं
नशिबावर न राहुन राबायला हवं
यश अपयश भले काही का असो
कष्टालाच हो नेहमी जागायला हवं

सहज असं या जगात काहीच नाही
झिजल्याशिवाय काही मिळत नाही
लक्ष्यात ठेव संघर्ष सर्वांनाच असतो
लढणाराच्या मात्र अस्तित्वास नडतो

हिसकावून सुख हा दुःख ओढवतो
नको असणाऱ्या हा डोहात बुडवतो
मोडून झोपेला रात्री बेरात्री जागवतो
संघर्षच भावा पावलोपावली रडवतो

स्वरूप संघर्षाचं योग्य समजुन घ्यावं
ठेऊन संयम हिमतीने बेधडक लढावं
भले जीवन आज हे अंधारात असेल
उदयाला मात्र तेजोमय प्रकाश वसेल

म्हणुन तु लढ स्वतःस्वतःस हरवू नकोस
होऊन नर्वस स्वतःस असा रोखु नकोस
बदलते वेळ ही तुला तुच बदलायला हवं
सोडुन भीती हरण्याची प्रयत्नास जागावं

खरं तर जीवन म्हटलं की आयुष्यात संघर्ष आलाच.
संघर्षाचे स्वरूप वेगवेगळे असते परंतु संघर्ष हा प्रत्येकाच्या वाट्याला येतोच.
फरक एवढाच आहे की काही जणांचा लवकर संपतो आणि काही जणांना सतत असा छळतो .
मग अशा सततच्या अपयशाने माणूस हताश होतो. त्याला समाजात कोणी चांगल्या नजरेने बघत नाही.
वेळोवेळी त्याला टोमण्यांना सामोरं जावं लागतं. मग नातेवाईक असो की समाज असो. की मित्र परिवार सारेच त्याच्याकडे वेगळ्या नजरेने बघु लागतात आणि मग सतत असे टोमणे मिळू लागल्याने माणूस स्वतःला स्वतःच कुठं तरी हरल्या सारखं वाटू लागतं
कारण मी आतापर्यंत संघर्ष करतच आलो आहे आणि अजुन ही करतच आहे.
संघर्ष अजुन संपलेला नाही. कधी संपेल माहीत ही नाही.
परंतु आजतागायत ना माघार घेतली ना घेणार शेवट कसा ही होवो लढणे सोडायचं नाही. आणि अश्याच प्रकारे अनेक लोकं आहेत जी टोकाचा संघर्ष करतात काही झालं तरी हार नाहीत मानत. तरी ही शेवटी मनात खंत असते की एवढ करुन ही नैराश्यच येत आहे तेव्हा कुठं थांबायला होतं.
जसे की जे मुले शिक्षण घेत आहेत. कुठं तरी एखाद्या शहरात अभ्यास करत आहेत. स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत. परंतु अजुन ही त्यांना त्यांच्या मनाप्रमाणे काही मिळाले नाही. घरातील आई वडील पैय-पैका जमा करुन आपल्या मुलांना पाठवत असतात. आणि त्या मुलांना वाटते की आपल्याला आता थांबलं पाहिजे कारण घरच्यांचा विचार त्यांच्या मनी ठसतो.
अशा सर्व परिस्थितीत असणाऱ्या माझ्या भावासाठी जे की माझ्या बँचचे मित्र आहेत जे अजुन ही त्यांची अपेक्षा कधी संपलेली नाही व संपणार ही नाही त्यांचा अभ्यास स्पर्धा परीक्षा वाचनालय असा प्रवास चालुच आहे. अजुन ही थांबलेले नाहीत.
सांगण्याच तात्पर्य हेच आहे की. जोपर्यंत आपण आपल्या स्वतःला हरवत नाहीत तोपर्यंत आपल्याला ह्या जगात कोणीच हरवू शकत नाहीत. अर्थात आपल्या हरण्याचे कारण आपण स्वतःचं असतो.

म्हणुन जे काही कोणी सततच्या निराशेपोटी सततच्या अपयशाला कंटाळतात भावानो तुम्हाला अपयश नाही तर पुन्हा मजबूत बनण्याची संधी मिळालेली आहे तेव्हा त्या संधीच सोने केलं पाहिजे.
तेव्हा कधीच जीवनात निराश होऊन परिस्थितीने जरी हताश झाला तरी काहीच शंका नाही बाळगायची व कुठलाही वेगळा मार्ग निवडायचा नाही किंवा कुठल्याही व्यसनाच्या स्वतःला स्वाधीन नाही करायचं.
ज्यातून नुकसान हे केवल आपले आणि आपलेच असते
संघर्ष कोणाला नाही प्रत्येकाला आहे.
म्हणुन उठा. उभं रहा आणि पुन्हा स्वतःला स्वतःची सुरवात करा. संघर्ष भले ही आज रडवतो परंतु पुर्ण केल्यास तुमच्या लढण्याची नोंद ही घेतो
#वेळबदलतअसतेसंयममहत्वाचा_असतो

                                     - ✍️ अंकुश सोनवणे

International

RELATED ARTICLES