Wednesday, July 30, 2025

National

spot_img

अखेर १९ दिवसांपासून फरार आरोपी डॉ. देवेश अग्रवाल झाला पोलिसांसमोर सरेंडर

१९ दिवस कुठे लपला होता की लपविण्यात आला यासाठी त्याचा पीसीआर घेण्याची जनतेची मागणी

महाराष्ट्र प्रतिनिधी संजीव भांबोरे

भंडारा जिल्ह्यातील साकोली येथील गत १९ दिवसांपासून पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार असलेला आरोपी डॉ. देवेश अग्रवाल याने अखेर आज २९ जुलैला भंडारा पोलिसासमोर शरणागती पत्करली. यातच साकोली पोलिसांनी त्याला स्थानिक न्यायालयात हजर केले असता पोलीस न्यायालयीन कोठडी मिळविण्यात यश प्राप्त झाले. आरोपी डॉ. देवेश अग्रवाल याला जामीन मिळावे याकरिता त्याच्या वकिलामार्फत जिल्हा न्यायालय, उच्च न्यायालय आणि सुप्रीम न्यायालय येथे याचिका दाखल करण्यात आली होती. परंतु तिन्ही ठिकाणी सदर याचिका फेटाळण्यात आली. त्यामुळे डॉ. देवेश अग्रवाल याच्यासमोर पर्याय नसल्यामुळे शेवटी शरणागतीला सामोरे जावे लागले.

या प्रकरणात आरोपीला मदत करीत असल्याच्या कारणावरून भाऊ डॉ. भरत अग्रवाल आणि जितेश अग्रवाल यांना देखील आरोपी करण्यात आले. ते सुद्धा त्यावेळी फरार झालेले होते. आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांचे जिल्ह्यातील ७ चमुचे पथक तयार करण्यात आले होते. सदर पथकाने बालाघाट, गोंदिया, अमरावती, पुणे, हैदराबाद, मुंबई आणि नागपूर जिल्हा पालथा घातला होता. इतर राज्यांच्या पोलीस ठाणे यांना सूचना व वायरलेस वरून संदेश देण्यात आले होते. इतकेच नव्हे तर आरोपीला पकडण्यासाठी सर्व पोलीस यंत्रणेला लूक आऊट नोटीस जारी करण्यात आले होते. या दरम्यान आरोपीला ताबडतोब अटक करावी यासाठी विविध संघटनांचे निवेदन देण्यात आले होते. तर आरोपीला त्यावेळी अटक करण्यासाठी उशीर होत असल्याने भंडारा येथेही निवेदने दिले. आरोपीला कुणी मुदत करू नये याकरिता २४ जुलै रोजी अप्पर पोलीस अधीक्षक निलेश मोरे आणि स्थानिक पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महादेव आचरेकर यांच्या मार्गदर्शनात स्थानिक पोलीस स्टेशन येथे पत्रकार परिषद घेण्यात आलेली होती. या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आरोपीला कोणीही मदत करू नये, आरोपीविषयी माहिती असल्यास पोलीस विभागाला द्यावी त्याचे नाव गुप्त ठेवण्यात येईल. आरोपीला जो कोणी मदत करेल त्याच्यावर कारवाईचा कठोर बडगा उगारला जाईल असे आवाहन करण्यात आले होते. विशेष म्हणजे या घटनेचे संपूर्ण जिल्ह्याभर पडसाद उमटलेले होते. या संपूर्ण घटनेतील सविस्तर वृत्त असेसविस्तर वृत्त असे की, साकोली शहरातील श्याम हॉस्पिटलमध्ये सोनोग्राफीच्या नावाखाली १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर डॉक्टरने अश्लील वर्तन केल्याची धक्कादायक घटना उघडगीस आली होती. याप्रकरणी पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी साकोली पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला होता. आरोपी डॉ. देवेश अग्रवाल पीडित मुलगी तिच्या आईसोबत ९ जुलै २०२५ रोजी उपचारासाठी श्याम हॉस्पिटलमध्ये आलेली होती. डॉ. देवेश अग्रवाल याने सोनोग्राफी करण्याची आवश्यकता असल्याचे सांगून आई आणि परीचारीकेला सोनोग्राफी रूम बाहेर थांबविण्यास सांगितले होते. त्यानंतर अर्धा तास एकटे असलेल्या पीडित मुलीसोबत डॉक्टरने अश्लील वर्तन केल्याचा आरोप केला गेला. रुग्णालयातून बाहेर पडल्यानंतर पीडित मुलीने घडलेला प्रकार आधी आईला व घरी परतल्यानंतर वडिलांना सांगितला. डॉक्टरने आपला हात धरून मोबाईल नंबर मागितले आणि कोणालाही काही न सांगण्याची धमकी मुलीने सांगितले. यापूर्वी डॉक्टरने इंस्टाग्राम वरून पीडीतेला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवल्याचे तक्रारीत म्हटले आहे. पीडितेच्या वडिलांनी ०९ जुलै रोजी दाखल केलेला तक्रारीवरून साकोली पोलिसांनी आरोपी डॉ. देवेश अग्रवाल विरोधात अपराध क्रमांक ४०१/२५ कलम ६४ ( २ ) क ६५ ( १ ) भारतीय न्याय संहिता २०२३ बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम २०१२ सह कलम ४, ६, ८ आणि अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम १९८९ च्या कलम ३ ( २ ) ,( ५ ) अन्वये गुन्हा दाखल केलेला होता.

आता फरार डॉक्टरने भंडारा पोलीसांसमोर सरेंडर केले आहे. परंतु जनता हे म्हणत आहेत की, हा १९ दिवसांपासून अखेर होता तरी कुठे लपला की दडविलेला.? पोलीस विभागाने या प्रकरणी न्यायालयाकडे त्याचा पीसीआर घेण्याची गरज आहे. कारण त्याला लपविणारे सुद्धा आज आरोपी आहेत आणि हेच सत्य समोर आले पाहिजे अशी जनतेमधून चर्चा सुरू झाली आहे. या फरार शोध घेण्यासाठी जिल्हा पोलीस अधिक्षक नुरूल हसन यांच्या मार्गदर्शनात अप्पर पोलीस अधिक्षक निलेश मोरे, उपविभागीय पोलीस अधिकारी आनंद चव्हाण, साकोली पोलीस निरीक्षक महादेव आचरेकर, उपनिरीक्षक प्रशांत वडूले यांनी जिवाचे रान केले होते हे विशेष.

International

RELATED ARTICLES