


अनुसूचित जमाती कल्याण समितीची शाळा, आरोग्य केंद्राला भेटी….प्रतिनिधी/ सचिन ढोके अमरावती : अनुसूचित जमाती कल्याण समितीने आज मेघाटातील विविध ठिकाणी भेटी दिल्या. यात समितीने शाळा, आरोग्य उपकेंद्र आदींना भेट दिली. या पाहणी दौऱ्यात समितीचे प्रमुख दौलत दरोडा यांच्यासह समितीचे सदस्य हरिशचंद्र भोये, केवलराम काळे, राजू तोडसाम, शांताराम मोरे, मंजुळा गावित, रामदास मसराम, उमा खापरे, राजेश राठोड, विनोद निकोले सहभागी झाले आहेत. आजच्या पाहणी दौऱ्यात समिती सदस्यांनी सकाळी एकलव्य मॉडेल स्कूलच्या इमारतीची पाहणी केली. यावेळी त्यांनी इमारतीची तातडीने दुरुस्ती करून शाळा सुरू करण्याच्या सूचना केल्या. त्यानंतर देवी पॉइंट येथे भेट दिली. मोथा येथील जिल्हा परिषदेच्या पूर्व माध्यमिक शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला, त्यानंतर मोथा प्राथमिक आरोग्य उपकेंद्राला भेट दिली. तसेच अंगणवाडीची पाहणी केली. समिती सदस्यांनी मडकी येथील उमेद बचत गटाच्या स्टॉलला भेट देऊन त्यांच्या कार्याची माहिती घेतली. त्यानंतर चिखलदरा नगरपरिषदेला भेट दिली. समिती सदस्यांनी सीमाडोह वन संकुलाला भेट दिली. मेळघाटातील आकर्षण असलेल्या कोलकाज येथील विश्रामगृहाला भेट देऊन पाहणी केली. सिपणा वन्यजीवच्या उपवनसंरक्षक नीता कट्टे यांनी मेळघाट व्याघ्र प्रकल्पाबद्दल माहिती दिली.



