
संजीव भांबोरे महाराष्ट्र प्रतिनिधी
अहिल्यानगर— जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील बोधेगाव चे सुपुत्र विवेक उर्फ भगवान सुधाकर मिसाळ यांना ए डी फाउंडेशन महाराष्ट्र राज्य या संस्थेच्या वतीने दरवर्षी देण्यात येणाऱ्या साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जीवन गौरव पुरस्कार २०२५ या पुरस्काराने आदर्श समाज सेवक पुरस्कार देऊन सांगली येथे सन्मानित करण्यात आले..सांगली येथील हरिप्रिया मल्टीपर्पज हॉल येथे आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात विविध मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.या कार्यक्रमाला खासदार विशाल पाटील. आमदार इद्रीस नायकवाडी,जतचे माजी आमदार विक्रम सावंत, माजी महापौर प्रा स्वाती नितीन सावगावे,राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष विष्णू माने, समाज प्रबोधनकार व्याख्यात्या स्वाती कोकरे,अध्यक्ष अशोक गोरड हे उपस्थित होते.विवेक उर्फ भगवान मिसाळ यांनी सामाजिक क्षेत्रात केलेल्या विशेष उल्लेखनीय काम केल्याबद्दल त्यांच्या कार्याचा गौरव करीत त्यांना आदर्श समाजसेवक म्हणून सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि पदकाने गौरविण्यात आले.मिसाळ यांनी आपल्या अहिल्यानगर मध्ये परिसरातील सामाजिक प्रश्न सोडवून उपेक्षितांना वंचित घटकांना न्याय मिळवून काम प्रामुख्याने सातत्यपूर्ण सुरू आहे याच कामाची दखल घेऊन एडी फाउंडेशनने साहित्यरत्न जीवन गौरव पुरस्काराने विवेक मिसाळ यांना सन्मानित केल्याबद्दल त्यांचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.यावेळी ए डी फॉऊंडेशनचे कार्याध्यक्ष महादेव महानोर आदीजण उपस्थित होते.या गौरवबद्दल. दूरध्वनीद्वारे आमदार अमितजी गोरखे.मा. मंत्री लक्ष्मण ढोबळे. अण्णाभाऊ साठे यांची वंशज सचिन भाऊ साठे. आमदार रमेश कदम.मा. संग्राम भैय्या जगताप. जिल्हा परिषद सदस्य नितीन काकडे. विकी साठे सांगली. मंगेश साळवे कोल्हापूर.योगेश जाधव मिरज. सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष सुरेश बनसोडे. अंकुश मोहिते. छत्रपती संभाजी ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष सचिन कांबळे. भाजपचे ज्येष्ठ नेते सुनील उमाप. चंदू काळुंखे. पंडित सर वाघमारे. सुभाष वाघमारे. प्रकाश घोरपडे. प्रदीप वावरे. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी मिसाळ यांचा पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला.अनिल सरोदे. मिलिंद दादा कांबळे .प्रदीप मोहिते. किरण भालेराव. बाप्पू चव्हाण. बोधेगाव चे सरपंच. सरला महादेव घोरतळे. उपसरपंच संग्राम काकडे. मेजर संतोष मासळकर. उद्योजक बाबा भाई पठाण.उद्योजक सुनील पाटोळे . संजय भाऊ मिसाळ. बाबासाहेब पवळे. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.



