
संजीव भांबोरे महाराष्ट्र प्रतिनिधी
भंडारा -जवाहर नगर पोलिसांनी दिनांक 30 ऑगस्ट 2025 रोजी पहाटे 4.30 मौजा कोंढी गावाजवळ आरोपी नामे आसिक मनहरण जोशी वय 24 राहणार भिलाई तालुका धमदा जिल्हा दुर्ग राहणार छत्तीसगड ,,मालक रोशनलाल रामस्वरूप डहेरीया वय 33 वर्षे राहणार पठारा तालुका धमदा जिल्हा दुर्ग राहणार छत्तीसगढ ,त्यांच्या ताब्यातील तपकिरी रंगाचे आयशर कंपनीचे वाहन क्रमांक CG 07CX 3833 किंमत 20,00000/रुपयाचे वाहनाचे डाल्यात काळे, पांढरे व लालसर रंगाचे एकूण 38 गोवंश जातीचे जनावर किंमत 3,80000/रुपयाचे जनावरे हे त्यांना वाहतूक करणे करिता प्रत्येकी जनावरास 2X2 मीटर जागा असणे बंधनकारक असताना सुद्धा त्यांनी आपले वाहनाचे डाल्यात पुरेशी जागा उपलब्ध नसताना जनावरे निर्दयतेने ,दाटीवाटीने कोंबून कत्तलीसाठी अपुऱ्या जागेत जनावरांना त्रास होईल असल्या स्थितीत तहानेने व्याकुळ झालेले अन्नपाणी निवाऱ्याची सोय न करता क्रूरतेने वागणूक देऊन त्या वाहतूक करताना मिळून आले असून त्यातील 4 जनावरे हे मृत पावले आहेत. असे फिर्यादीचे लेखी तक्रारीवरून आरोपी विरुद्ध 314/2025 अन्वये महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा कलम 5,5(अ)5(बंद)9 आणि प्राणी कृतीने वागविण्यापासून प्रतिबंधक अधिनियम कलम 11(1)(घ)(च)(ड)(ज)(झ )तसेच भारतीय दंड संहिता कलम 325 अन्वये गुन्हा नोंद करून तपासात घेतला .सदरची कार्यवाही पोलिस अधीक्षक नुरुल हसन, अप्पर पोलीस अधीक्षक निलेश मोरे ,पोलीस निरीक्षक पाटील यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक चुटे ,सहाय्यक फौजदार गोंडाने ,पोलीस हवालदार सपाटे, पोलीस शिपाई नारनवरे पोलीस स्टेशन जवाहर नगर यांनी केली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दूधकावरा पोलीस स्टेशन जवाहरनगर करीत आहेत.



