जागतिक कौशल्य स्पर्धेत सहभाग घेण्याचे आवाहन प्रतिनिधी/सचिन ढोके अमरावती: जगातील सर्वात मोठी व्यवसायिक शिक्षण आणि कौशल्य उत्कृष्टता स्पर्धा दर दोन वर्षांनी घेण्यात येते. या स्पर्धेत जगभरातील 23 वर्षाखालील तरुणांना कौशल्य सादर करण्याची संधी असते. या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. सन 2026ची जागतिक कौशल्य स्पर्धा शांघाई येथे होणार आहे. जागतिक कौशल्य स्पर्धेच्या पूर्व तयारीच्या दृष्टीने 63 क्षेत्राशी संबंधित जिल्हा व राज्यस्तरावर व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, सेक्टर स्किल कॉन्सील, विविध औद्यागिक आस्थापनांच्या सहकार्याने स्किल कॉम्पीटीशन आयोजित करण्यात आली आहे. सदर स्पर्धेचे आयोजन जिल्हा, विभाग, राज्य आणि देश पातळीवर करून निवड केलेल्या उमेदवारांची नावे जागतिक नामांकनासाठी पाठविण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी वयोमर्यादा हा एकमेव निकष आहे. सहभागी होण्यासाठी 50 क्षेत्राकरीता उमेदवाराचा जन्म दि. 1 जानेवारी 2004 किंवा नंतरचा असणे आवश्यक आहे. तसेच डिजीटल कन्स्ट्रक्शन, क्लाऊड कॉम्प्युटींग, सायबर सिक्युरिटी, आयसीटी नेटवर्क इन्फ्रास्ट्रक्चर, अॅडिटीव्ह मॅनुफॅक्चरिंग, इंडस्ट्रीअल डिझाईन टेक्नॉलॉजी, इंडस्ट्री 4.0, मॅकॅट्रोनिक्स, ऑप्टोइलेक्ट्रॉनिक टेक्नॉलॉजी, रोबोट सिस्टीम इंटीग्रेशन, वॉटर टेक्नॉलॉजी, डेंटल प्रोस्टेथिक्स, एअरक्राफ्ट मेंटनन्स या क्षेत्राकरिता उमेदवाराचा जन्म दि. 1 जानेवारी, 2001 किंवा नंतरचा असणे आवश्यक आहे. जागतिक कौशल्य स्पर्धेकरिता इच्छुक असणाऱ्या पात्र उमेदवारांनी skillindiadigital.gov.in या संकेतस्थळाला भेट देवून दि. 30 सप्टेंबर 2025 पर्यंत नाव नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त प्रांजली बारस्कर यांनी केले आहे.
जागतिक कौशल्य स्पर्धेत सहभाग घेण्याचे आवाहन