Thursday, January 15, 2026

National

spot_img

नगरपरिषदेच्या शासकीय नोटीसाला राजकीय दबाव शासकीय रस्त्यावर स्लॅबचे ३ फूट रोडवर अतिरिक्त बांधकाम प्रकरण.

संजीव भांबोरे महाराष्ट्र प्रतिनिधी

भंडारा -साकोली येथील शासकीय नगरपरिषद रोडवर घराच्या स्लॅबचे ३ फूट रोडवर अतिरिक्त बांधकामाची तक्रार जागृत जनतेने नगरपरिषदेला दिली. त्यातच मुख्याधिकारींनी ता. २९ ऑगस्टला सदर बांधकाम कमी करण्यासाठी नोटीस देऊनही काम सर्रासपणे सुरू आहे. यात येथे राजकीय दबावामुळे अश्या अवैधरित्या कामांना पाठबळ मिळत असल्याचा आरोप जनतेने केला आहे. आणि शासकीय नोटीसाला “चिल्लर” समजून काहींनी याच प्रकारे नगरपरिषदेला बदनाम करण्याचा डाव होत आहे. यावर नगरपरिषदेने आता उच्चस्तरीय कारवाई करण्याची मागणी पुढे आली आहे. सविस्तर की, बिरसामुंडा चौक, सेंदूरवाफा येथील जागरूक नागरिक अर्जदार सत्यवान नरेश गजभिये यांनी दि. ०५/०८/२०२५ ला विषयाच्या अनुषंगाने नगरपरिषदेला तक्रार केली की, शारदा आनंदराव निकुरे, बिरसामुंडा चौक सेंदूरवाफा यांनी रमाई आवास योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या घरकुलाची नगरपरिषदेने मौका चौकशी केली असता, ते घरकुलाचे बांधकाम करीत असून सार्वजनिक रस्त्यावर ३ फुटाचे स्लॅबचे अतिरिक्त बांधकाम करीत असल्याचे निदर्शनास आले. याबाबद या तक्रारीची दखल घेत नगरपरिषद सीओ मंगेश वासेकर यांनी तात्काळ नोटीस बजावली की, आपण ३ फुटापर्यंत केलेली सेंट्रीग कमी करून रस्त्याच्या बाजूने फक्त ६ इंच स्लॅब (कानस) बाहेर काढावे. अन्यथा आपले पुढील देयके थांबविण्यात येतील व आपले घरकुल रद्द करण्यात येईल तसेच आपणास देण्यात आलेले देयके आपणाकडून वसूल करण्यात येतील, याची गांभीर्याने नोंद घ्यावी. परंतू शासकीय नोटीस देऊनही त्या नोटीसाला राजकीय दबावात ठेंगा दाखविण्यात येत आहे. असा आरोप तक्रारकर्त्यांनी केला आहे. याची नगरपरिषदेने उच्चस्तरीय कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.

International

RELATED ARTICLES