Friday, January 16, 2026

National

spot_img

नांदगाव पेठ येथील आर्थिक समावेशनात बँकांच्या योजनांची माहितीलाभार्थ्यांना धनादेश वाटपप्रतिनिधी/सचिन ढोके

नांदगाव पेठ येथील आर्थिक समावेशनात बँकांच्या योजनांची माहितीलाभार्थ्यांना धनादेश वाटपप्रतिनिधी/सचिन ढोके अमरावती: सेंट्रल बँक ऑफ इंडिया आणि युनियन बँक ऑफ इंडिया यांच्या वतीने नांदगाव पेठ येथील संत काशीनाथ महाराज सभागृहात ग्रामपंचायतस्तर आर्थिक समावेशन कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमामुळे आर्थिक साक्षरता आणि समावेशन विकासाला चालना देण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल ठरले. कार्यक्रमात बँकांच्या योजनांची माहिती देण्यात आली, तसेच लाभार्थ्यांना धनादेशाचे वाटप करण्यात आले. नांदगाव पेठच्या सरपंच कविता डांगे अध्यक्षस्थानी होत्या. आरबीआय नागपूरचे क्षेत्रीय निर्देशक सचिन शेंडे प्रमुख पाहुणे होते. तसेच आरबीआयच्या उप महाव्यवस्थापक अंजना शामनाथ, सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे क्षेत्रीय प्रमुख सुनील पांडे, युनियन बँक ऑफ इंडिया क्षेत्रीय प्रमुख प्रमोद परहाटे, अग्रणी जिल्हा व्यवस्थापक नरेश हेडाऊ उपस्थित होते. श्री. शेंडे यांनी आर्थिक समावेशनाचे महत्त्व सांगितले. तसेच प्रधानमंत्री जनधन योजनेसह आरबीआयच्या उपक्रमांबद्दल माहिती दिली. प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना आणि अटल पेन्शन योजनेचे महत्त्व अधोरेखित केले. या योजनांनी नागरिकांना सामाजिक सुरक्षा, जीवन विमा आणि अपघात विमा प्रदान केला असल्याचे सांगितले. अंजना शामनाथ यांनी, डिजिटल बँकिंगमधील सायबर सुरक्षा आणि सुरक्षित, पारदर्शक आणि सुलभ बँकिंग सेवांसाठी केवायसीचे महत्त्व सांगितले. श्री. पांडे यांनी, सेंट्रल बँक ऑफ इंडिया जनधन योजनेसह इतर योजना राबविण्यात आघाडीवर आहे. यामुळे जिल्ह्यात आर्थिक समावेशनात अव्वल स्थान मिळविले आहे. तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या योजनांबाबत जागरूकता आणि नोंदणी करण्यात बँकेच्या भूमिकेवर भर दिला. श्री. परहाटे यांनी आर्थिक विकासात आर्थिक समावेशनाची महत्त्वाची भूमिका अधोरेखित केली, बँकिंगची उपलब्धता व्यक्तींना सक्षम बनवते आणि ग्रामीण विकासाला चालना देते असल्याचे सांगितले. श्री. हेडाऊ यांनी, बँकांच्या संयुक्त उपक्रमाचे कौतुक केले. नागरिकांपर्यंत शासनाचे लाभ पोहोचवण्यासाठी अशा कार्यक्रमांची आवश्यकता असल्याचे सांगितले. यावेळी ग्रामीण भागात आर्थिक सक्षमीकरणाची पोहोच दर्शविणारे विविध शासकीय योजनांचे धनादेश लाभार्थ्यांना वाटप करण्यात आले.

International

RELATED ARTICLES