
अरुण वाघमारे मुंबई प्रतिनिधी
मुंबईतली अश्विनी जगदाळे-भोसले ही विवाहित तरुणीनुकतीच बिजवडी इथं माहेरी आली होती. रात्री 7 ते 8दरोडेखोर या गावात शिरले. दोन कुटुंबीयांना मारहाण करून लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला. नंतर ही टोळीअश्विनीच्या घरात शिरली. बल्ब फोडून अगोदर अंधारकेला. आईच्या गळ्यातलं गंठण हिसकावून घेतलं. मग ते तिच्याकडं वळाले.सुरुवातीला ती घाबरली होती. मात्र तिच्या लेकराला चाकू लावताच ती भलतीच ‘सटकली’. तोच चाकू हातात घेवून तिनं जोरजोरात शिव्या देत दरोडेखोरांवर प्रतिहल्ला केला. ‘रणरागिणी’चा हा काली अवतार पाहून टोळी पुरती भेदरली. त्यांनी तत्काळ सुंबाल्या केला. होय. या आईने बाळाच्या सुरक्षेसाठी एवढा तीव्र हल्ला चढवला की चोरांनाही माघार घ्यावी लागली. एकटी बाई अबला वगैरे या फक्त बोलायच्या गोष्टी आहेत हे अश्विनीने सिद्ध केले. एकट्या अश्विनीने दाखवलेल्या या धैर्याला सलाम. नुसतं शेअर करू नका यातून बोध देखील घ्या. पुरुषांना जमलं नाही,ते एका मातेनं केलं. आज च्या युगातील वीरमातेला सलाम. प्रसारित, बिजवडी पोलीस ठाणे.



