Thursday, January 15, 2026

National

spot_img

भंडारा जिल्ह्यात स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजारोहण व जागर नशा मुक्ती कार्यक्रमाचा समारोप

भंडारा जिल्ह्यात स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजारोहण व जागर नशा मुक्ती कार्यक्रमाचा समारोप संजीव भांबोरे भंडारा -15 ऑगस्ट 2025 रोजी भंडारा जिल्ह्यातील परेड ग्राउंड पोलीस मुख्यालय येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला .कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रीय ध्वजवंदन करून झाली. पालकमंत्री भंडारा जिल्हा संजय सावकारे यांनी ध्वजारोहण केले व स्वातंत्र्य दिनानिमित्त मार्गदर्शनपर भाषण केले. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक भंडारा नुरूल हसन जिल्हाधिकारी भंडारा सावंत कुमार तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते. ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीत व महाराष्ट्र राज्य गीत सादर करण्यात आले .त्यानंतर पोलीस ,होमगार्ड ,एनसीसी, विद्यार्थी आदींच्या तुकड्यांनी आकर्षण संचालन परेड सादर केले .यानंतर जॉगर नशामुक्ती कार्यक्रमाच्या समारोप क्राईम मीटिंग पोलीस मुख्यालय येथे आयोजित करण्यात आला .कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन पूजनाने झाली त्यानंतर मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. पालकमंत्री संजय सावकारे, खासदार प्रशांत पडोळे ,आमदार परिणय फुके ,आमदार नरेंद्र भोंडेकर आमदार राजू कारेमोरे ,जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे स्वागत विविध वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी केले .पोलीस अधीक्षक नुरूल हसन यांनी जागरण नशामुक्ती कार्यक्रमाची प्रस्तावना केली व यामध्ये 28 दिवस राबविलेले नशा जनजागृती चे कार्यक्रमाची थोडक्यात माहिती सादर करण्यात आली .यानंतर जागर नशा मुक्ती मोहीम अंतर्गत व्हिडिओ प्रदर्शन सादर करण्यात आले. शिव बिहार Cyber AWareness book ज्यामध्ये सायबर गुन्ह्यांपासून संरक्षण महिला व बालकांचे सुरक्षितता उपाय, सोशियल मीडिया , हाताडतानी होणारे फसवणूक तसेच ऑनलाईन व आर्थिक होणारे फसवणूक याबाबत संक्षिप्त माहिती दिली .तसेच भंडारा पोलिसांचे केलेले कार्य व चांगली कामगिरी लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी पोलिसांचे कर्तव्य व सेवा पुस्तक सुरू करण्यात आले .पुस्तकाचे अनावरण पालकमंत्री यांचे हस्ते करण्यात आले .कार्यक्रमात जीपीएस प्रणालीचे अनावरण देखील झाले. ही प्रणाली भंडारा जिल्ह्यातील सर्व पोलीस वाहनांवर बसविण्यात आली असून त्याद्वारे घटनास्थळी जलद पोहोचविण्यास मदत होते व प्रभावीपणे रात्रग्रस्त करण्यात येणार आहे .यानंतर भंडारा जिल्हा पोलिसांची अधिकृत वेबसाईटच्या सुद्धा अनावरण करण्यात आले. या वेबसाईटवर भंडारा जिल्हा पोलीस विभागाची संबंधित सर्व माहिती नागरिकांच्या हरविलेल्या मोबाईल ब्लॅक करण्याची विनंती ,सेवा चक्षु प्रणाली ,ताज्या घडामोडी व पोलिसांच्या विविध उपक्रमांची माहिती दिलेली आहे. जिल्हाधिकारी ,आमदार ,पालकमंत्री यांनी मार्गदर्शन केले. जागर नशा मुक्ती अभियानांतर्गत घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धा ,वक्तृत्व स्पर्धा व निबंध स्पर्धा यातील विजेत्या 140 विद्यार्थ्यांचे तसेच पटनाट्य सादर करून जनजागृती करणाऱ्या जे. एम पटेल, एन एस एस ग्रुप ,हनुमान व्यायाम शाळा मोहगाव देवी ,भंडारा व्यसनमुक्ती केंद्र, अस्तित्व व्यसनमुक्ती केंद्र ,असे एनजीओ व शाळा आणि विद्यार्थ्यांचा सत्कार पालकमंत्री यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाच्या समारोप राष्ट्रगीत सादर करण्यात आले .जनजागृतीसाठी सायबर पथक वाहन ला पालकमंत्री यांनी हिरवा झेंडा दाखवून अनावरण करण्यात आला. कार्यक्रमात जिल्ह्यातील सर्व शासकीय अधिकारी, पोलीस अधिकारी ,कर्मचारी विद्यार्थी ,स्वयंसेवी संस्था व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

International

RELATED ARTICLES