
सुदैवाने मुलांसोबतची जीवितहानी टळली ; साकोली येथील घटना संजीव भांबोरेभंडारा-सतत दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे शहरातील सिव्हिल प्रभाग ०८ येथे भर चौकातील असलेली जूनी मोठी विहीर जमिन समांतर होऊन कोसळली. यामध्ये पाणी असून सुदैवाने मुलांसोबतची जीवितहानी टळली आहे. घटनेची माहिती मिळताच मुख्याधिकारी आपल्या चमुंसह घटनास्थळी दाखल झाले असून मुख चौकात सुरक्षा व्यवस्थेत कठडे लावण्याचे कार्य प्रगतीवर आहे. सिव्हिल वार्ड प्रभाग क्र. ०८ प्रबुद्ध चौकातच मोठी व जूनी विहीर आहे. दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे ( शुक्रवार २५ जुलै ) च्या मध्यरात्री १२:४० दरम्यान अचानक विहीरीचे कठडे कोसळले. विहीरीत अती प्रमाणात पाणी होते आणि जणू भर चौकातच भला मोठा पाण्याचा खोलगट खड्डा तयार झाला. जनतेने सांगितले की, ही घटना दिवसा झाली असती तर या चौकात नेहमीच लहान मुले विहीर जवळ समाजमंदिर समोर खेळतात. पण सुदैवाने ही मुलांसोबतची जीवितहानी टळली आहे. सदर घटनेची माहिती मिळताच ( शुक्र. ता. २५ जुलै ) ला मुख्याधिकारी मंगेश वासेकर, न. प. पाणीपुरवठा अभियंता संतोष दोंतूलवार यांनी आपल्या चमुसोबत घटनास्थळी धाव घेतली. या मुख्य चौकात त्या क्षतीग्रस्त विहीरीच्या खोल खड्ड्याभोवताल सुरक्षा कठडे लावण्याचे काम सुरू झाले. व तातडीची सुरक्षा उपाययोजना करण्यात आली. यावेळी माजी नगरसेवक हेमंत भारद्वाज, पराग कोटांगले, मोहन टेंभुरकर आणि सर्व सिव्हिल वार्डातील महिला पुरुष जनता मोठ्या प्रमाणात उपस्थित होती.