
युवा प्रबोधनकार सतिश सोमकुवर यांची भारतीय बौद्ध महासभेच्या नागपूर जिल्हा पश्चिम शाखेचे संस्कार सचिव पदी नियुक्ती व आजीवन सदस्यता. संजीव भांबोरेनागपूर -भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेली भारतीय बौद्ध महासभेचे रोपटे आदरणीय महाउपासिका मिराताई यशवंत आंबेडकर यांचा अध्यक्षतेखाली व छत्रछायेखाली ह्या रोपट्याचा वटवृक्ष झाला. आणि आज कार्याध्यक्ष सरसेनानी खंबीरनेतृत्व मा. भीमराव यशवंत आंबेडकर साहेब रात्रंदिवस भारतीय बौद्ध महासभा वाढविण्यासाठी व फुलवण्यासाठी जीवाचे रान करीत आहे. भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेली भारतीय बौद्ध महासभा या मातृसंस्थेत प्रबोधनकार सतीश सोमकुवर यांची काम करण्याची खूप दिवसांपासून मनस्वी ईच्छा होती. आणि खऱ्या अर्थाने भारतीय बौद्ध महासभा च्या माध्यमातून भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या बौद्धधम्म चळवळीतुन समाजात जनजागृती निर्माण करून आदर्श बौद्ध समाज निर्मितीचे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्नपूर्ती साठी आपला हातभार लावून समाजसेवा घडावी हा उदात्त हेतू आहे. प्रबोधनकार सतीश सोमकुवर यांच्या सामाजिक कार्याची व समाजहित तळमळीची दखल घेत दिनांक 19 ऑगस्ट 2025 रोजी भारतीय बौद्ध महासभा नागपूर जिल्हा पश्चिम शाखेचे अध्यक्ष विलास उंदिरवाडे व सर्व नागपूर जिल्हा कार्यकारणी पदाधिकारी यांनी एक मताने युवा प्रबोधनकार सतिश सोमकुवर यांची भारतीय बौद्ध महासभेच्या नागपूर जिल्हा पश्चिम शाखेचे संस्कार सचिव पदी नियुक्ती करण्यात आली आहे व आजीवन सदस्यता युवा प्रबोधनकार सतीश सोमकुवर यांनी स्वीकारली आहे. प्रबोधनकार सतीश सोमकुवर यांनी त्यांच्या नियुक्ती बद्दल सर्वांचे आभार व्यक्त करत धन्यवाद मानले आहे. युवा प्रबोधनकार सतिश सोमकुवर यांचे भारतीय बौद्ध महासभेच्या नागपूर जिल्हा पश्चिम शाखेचे अध्यक्ष आद. विलास उंदिरवाडे, अशोक डूले, तालुका अध्यक्ष सिद्धार्थ शंभरकर, दीपक रामटेके, राजेश गोंडाने, पद्माकर गणवीर, अशोक झामरे, भीमराव फुसे, तनुजा झिलपे, अरुण वाहणे, विजय मून, अनिल नगराळे जेष्ठ पत्रकार विनायक इंगळे(गुरुजी) आनंद वाघमारे, पंकज भगत, श्रावण गोसावी, सुभाष मानवटकर सर्व पदाधिकारी व बौद्ध उपासक उपासिका यांनी स्वागत करत अभिनंदन केले आहे तसेच मित्र परिवाराकडून सुद्धा अभिनंदन करण्यात येत आहे.



