
संजीव भांबोरे महाराष्ट्र प्रतिनिधी
पुणे -इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठानचे विश्वासराव रणसिंग महाविद्यालय कळंब वालचंदनगर महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय सेवा योजना व इतिहास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ऑगस्ट क्रांती दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून मराठा रेजिमेंटचे सुभेदार मेजर ऑनररी कॅप्टन जयपाल शिवाजी राजेभोसले उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठानचे सचिव वीरसिंह रणसिंग उपस्थित होते. मराठा रेजिमेंटचे सुभेदार मेजर ऑनररी कॅप्टन जयपाल शिवाजी राजेभोसले यांनी आपल्या मनोगतातून कारगिल युद्धाच्या आठवणी सांगितल्या. प्रत्यक्षात युद्ध कसे असते, त्यांना आलेले अनुभव, त्यांनी प्रत्यक्षात केलेल्या कारवाई अर्थात एका सैनिकाचे जीवन कसे असते हे आपल्या मनोगतातून विशद केले. अनेक विद्यार्थ्यांनी यातून प्रेरणा घ्यावी व सैनिक बनून देशाची सेवा करावी अशी अपेक्षा व्यक्त केली. सचिव वीरसिंह रणसिंग यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून देशासाठी बलिदान दिलेल्या सैनिकांच्या व जयपाल राजेभोसले यांच्या कार्याला सलाम केला. देशासाठी वीरमरण पत्करलेल्या सैनिकांचे बलिदान लक्षात ठेवून आपण देशासाठी, समाजासाठी कार्य करत राहिले पाहिजे असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे उपप्राचार्य व इतिहास विभाग प्रमुख प्रा. ज्ञानेश्वर गुळीग यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सुवर्णा बनसोडे व आभार सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. विद्या गुळीग यांनी व्यक्त केले.कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक व प्राध्यापकेत्तर कर्मचारी व ६५ विद्यार्थी उपस्थित होते.



