
शिवनेरी फाऊंडेशन आयोजित मोफत दंत तपासणी शिबिराचा 150 विद्यार्थ्यांनी घेतला लाभ संजीव भांबोरे महाराष्ट्र प्रतिनिधीउल्हासनगर – शिवनेरी फाउंडेशन द्वारा १५ ऑगस्ट रोजी कुर्ला कॅम्प उल्हासनगर ४ येथील श्री छत्रपती शिवाजी प्राथमिक विद्यालय येथील शाळेतील विद्यार्थी करिता आयोजित मोफत दंत तपासणी शिबिर पार पाडण्यात आले. असून सदर शिबिरात एकूण १५० विद्यार्थी यांनी लाभ घेतला होता प्रत्येकी त्यांना एक टूथपेस्ट, एक ब्रश तसेच बिस्कीट व इ. वस्तू त्यांना देण्यात आले.सदर शिबिरा करिता मोलाचे योगदान देण्यासाठी डॉ निरंजला गंगाधर मोहड, डॉ.संघमित्रा वाहुले, डॉ पूजा गांजरे उपस्थित होत्या. शिवनेरी फाउंडेशन द्वारे प्रमुख पाहुणे कुर्ला कॅम्प विभागातील भारतीय संरक्षण दलाचे (माजी सैनिक) मच्छिंद्रजी खोंड यांना आमंत्रित करुन यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले असून श्री छत्रपती शिवाजी प्राथमिक विद्यालय मधील मुख्याध्यापिका सौ नलिनी अशोक कुवर,उल्हास इंगळे ,नवलसिंग पाटील, मेघा शिंदे,सुषमा जोंधळे,सुषमा इंगळे , धनश्री चव्हाण मॅडम आदी मान्यवर उपस्थित होते.मोफत दंत तपासणी शिबिर चे आयोजक शिवनेरी फाउंडेशनचे अध्यक्ष रवींद्र मिंडे, उपाध्यक्ष अरविंद खरात,सचिव ॲड प्रशांत चंदनशिव, खजिनदार सुरेश वीर,भास्कर शिनगारे, भास्कर गाडे, सूर्यकांत जाधव, शिलेश बर्वे तसेच शिवनेरी फाउंडेशनचे पदअधिकारी या ठिकाणीं उपस्थित होते.



